Panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ‘रेडक्रॉस’च्या निवडणुकीला आव्हान

Panaji News : संस्था सदस्य ॲड. रुई फेरेरा यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी, भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या गोवा शाखेच्या व्यवस्थापन मंडळाच्या निवडणुकीला संस्थेचे आजीवन सदस्य ॲड. रुई फेरेरा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे.

त्यांची याचिका दाखल करून घ्यावी की नको, यावर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. फेरेरा यांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही निवडणूक प्रक्रियेची सुरवात ही मतदार यादी निश्चितीवरून होते. संस्थेच्या संकेतस्थळावर मतदारांची यादी २०१३ पर्यंतच अद्ययावत करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी असून उपजिल्हाधिकारी साहाय्यक निवडणूक अधिकारी आहेत. ॲड. फेरेरा यांना या निवडणुकीची माहिती मिळाल्यावर त्यांनी सुरवातीला २४ जुलै व नंतर २६ जुलै रोजी आक्षेप अर्ज सादर केले. त्याला उत्तर न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ही सरकारी संस्था असून संसदेच्या कायद्याने अस्तित्वात आलेली आहे. यामुळे निवडणुकीची माहिती राजपत्रात देणे आवश्यक आहे असेही त्यांचे म्हणणे आहे.

आचारसंहितेच्या भंगाचा दावा

राष्ट्रपती हे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यपाल हे गोवा शाखेचे अध्यक्ष असलेल्या या संस्थेची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच कार्याध्यक्षांच्या वाढदिवशी घेतलेल्या रक्तदान शिबिरामुळे आचारसंहितेचा भंग झाल्याचा दावा फेरेरा यांनी याचिकेत केला आहे. त्यांनी ही निवडणूक प्रक्रिया सदोष असल्याने ती रद्द करण्याची मागणी याचिकेतून केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना 12 कोटी 70 लाख रुपये मंजूर

SCROLL FOR NEXT