Notice Dainik Gomantak
गोवा

Illegal Cables: वीज खांबांवरील केबल्स तडकाफडकी कापल्या, 80 लाखांचा दंड! कारणे दाखवा नोटिशीला इंटरनेट पुरवठा कंपनीचे आव्हान

Notice By Internet Service Providers: कार्यकारी अभियंत्याने तडकाफडकी केलेल्या कारवाईमुळे इंटरसेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्या यांच्यावर परिणाम होण्याबरोबरच सेवाही ठप्प झाली.

Sameer Panditrao

पणजी: ‘राईट ऑफ वे’ (आरओडब्ल्यू) अंतर्गत नियम धाब्यावर बसवून मनमानीपणे वीज खांबावरील इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्यांच्या केबल्स कापणाऱ्या अधिकाऱ्याच्या कारवाईला तसेच लाखोंचा दंड ठोठावणाऱ्या कारणे दाखवा नोटिशीला मे. ईडगेकॉम टेलिकॉम्युनिकेशन्स प्रा. लि. या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले आहे. खंडपीठाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावून पुढील सुनावणी २९ एप्रिलला ठेवली आहे.

याचिकादार मे. ईडगेकॉम टेलिकॉम्युनिकेशन्स प्रा. लि. या कंपनीने याचिकेत कार्यकारी अभियंता (विभाग १, वीज खाते), मुख्य वीज अभियंता, माहिती तंत्रज्ञान खाते, राज्य सरकार व केंद्र सरकार याना प्रतिवादी केले आहे. याचिकादाराकडे इंडियन टेलिग्राफ कायद्याच्या कलम ४ खाली परवाना आहे तसेच राईट ऑफ वे खाली परवानाही आहे.

अभियंत्याने नोडल अधिकारी असल्याचा अधिकार वापरून बेकायदेशीरपणे वीज खांबांवरील इंटरनेट केबल्स कापले तसेच १८ टक्के जीएसटी लादून ८० लाखांचा दंड ठोठावण्याची कारणेदाखवा नोटीस बजावली. ही कारवाई बेकायदेशीर आहे. १ जानेवारी रोजी लागू झालेल्या `राईट ऑफ वे` नुसार या अधिकाऱ्याला सक्षम अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले नव्हते. त्यामुळे हा आदेश निष्पक्षतेच्या तत्त्वांचे पूर्णपणे उल्लंघन करणारा आहे, असा दावा करण्यात आला आहे.

तडकाफडकी कारवाई

वीज विभागाने वीज खांबांवरील केबल्स घालण्यासाठी प्रति खांब १०० रुपये शुल्क आकारण्याची तरतूद असताना प्रति खांब ३०० रुपये भाडे शुल्क आकारण्यात येत आहे, हे नियमांच्या विरुद्ध आहे. कार्यकारी अभियंत्याने तडकाफडकी केलेल्या कारवाईमुळे इंटरसेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्या यांच्यावर परिणाम होण्याबरोबरच सेवाही ठप्प झाली. त्यामुळे हा आदेश रद्द करण्यात यावा, अशी विनंती उच्च न्यायालयातील याचिकेत केली आहे. सरकारने या कारवाई दखल घेऊन केबल्स कापण्याची प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT