Chala Boluya camp Dainik Gomantak
गोवा

Goa: 'चला बोलूया'! साखळी येथील संवेदन केंद्रातर्फे झालेले अभिनव शिबिर

Chala Boluya camp: कुमारवयीन मुलांसाठी दोन दिवसीय विशेष नाट्य प्रशिक्षण या शिबिरात घेण्यात आले. युवा नाट्यकलाकार दिव्या गावस, सिद्धांत खांडेकर आणि अजय फोंडेकर यांनी हे प्रशिक्षण दिले.

Sameer Panditrao

पर्ये :सर्व मुलांच्या हाताला समानतेचा धागा बांधला गेला आणि पाच प्रकारच्या धान्यांचे रोपण करून साखळी येथील संवेदन केंद्रातर्फे कातकरी मुलांसाठी आयोजित केले गेलेले 'चला बोलूया' हे सात दिवसांचे निवासी शिबीर, कुडणे-साखळी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात उत्साहात सुरू झाले. या शिबिरात कातकरी आणि इतर समाजातील मिळून एकूण ५५ विद्यार्थी सहभागी झाले होते. या शिबिरात प्राथमिक गट व कुमारवयीन गट अशा दोन गटांमध्ये स्वतंत्र कार्यक्रम राबवण्यात आले.

नवसो परवार यांची क्राफ्ट व ओरिगामी कार्यशाळा, वापरलेल्या कपड्यांपासून पायपुसणी तयार करण्याचे ऐश्वर्या चारी यांनी दिलेले प्रात्यक्षिक, झाडांच्या पानांपासून शोभेच्या वस्तू तयार करण्यासंबंधी सूर्यकांत गावकर यांचे मार्गदर्शन, शिक्षणात्मक खेळ व गाण्यांच्या माध्यमातून समृद्धी गणपुले यांनी घेतलेले सत्र, तन्वी धुरी, मनोज देसाई आणि तुष्मी नाईक यांची स्टोन पेंटिंग तर लीफ पेंटिंग विषयावर अक्षता माईणकर व अंगारिका सावंत यांची कार्यशाळा, 'जैवविविधतेची जंगलबुक' या विषयावर संकेत नाईक यांचे माहितीपूर्ण सत्र, देवेंद्र गावडे यांचे ऐरोबीक्सवर व सतिम यांचे कब्बड्डीवर मार्गदर्शन यातून प्राथमिक गटातील मुलांनी या शिबीराचा आनंद लुटला.

कुमारवयीन मुलांसाठी दोन दिवसीय विशेष नाट्य प्रशिक्षण या शिबिरात घेण्यात आले. युवा नाट्यकलाकार दिव्या गावस, सिद्धांत खांडेकर आणि अजय फोंडेकर यांनी हे प्रशिक्षण दिले. कातकरी मुलांमध्ये असलेली भीती, न्यूनगंड कमी व्हावा आणि त्यांनी इतर मुलांबरोबर मुक्तपणे बोलावे यासाठी या शिबिर आयोजनाचा हेतू होता. त्यासाठी नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा होती. त्यात इतर मुलांबरोबरच कातकरी मुलांनीही चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला.

इतिहासप्रेमी अमेय किंजवडेकर यांनी कुडणे गावाची सांस्कृतिक ऐतिहासिक संचिताची माहिती या शिबिरात मुलांना दिली. कुडणेतील पुरातन जैन मंदिर, सूर्य मंदिर आणि जुन्या पाषाणी मूर्ती तसेच तसेच विविध वृक्षांची माहिती त्यांनी यावेळी दिली. एका दिवशी कुडणे येथील यशवंत राणे यांच्या कुळगरात आयोजित झालेला विविध खेळ, गाण्यांचा कार्यक्रमही रंगला.

Goa laptop scheme students

सात दिवस चाललेल्या या शिबिराला संवेदन केंद्राच्या कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले. शिबिर यशस्वी होण्यासाठी प्रकल्प समन्वयक दशरथ मोरजकर, प्रकल्प प्रशिक्षक बाबनी मापारी, नमन सावंत, देवानंद गावडे, माधवी राणे, स्नेहा सबनीस, दिनेश सावंत, रेश्मा मोरजकर, ज्योती धुरी, अंगारिका सावंत, अक्षता माईणकर, सुनिल केरकर, वैष्णवी गांवकर, सिद्धी माईणकर, तन्वी केरकर, आर्या वझे, श्रेया दळवी, स्नेहा गावस, कविता यमकर, बेबीनाझ यांचे तसेच बिमली पवार, शालन पवार व विश्रांती निकम या कातकरी महिलांचे योगदान लाभले.

हरमल-पेडणे येथील महाविद्यालयाला भेट

शिबिरादरम्यान मुलांनी हरमल-पेडणे येथील गणपत पार्सेकर शिक्षण महाविद्यालयाला भेट देऊन तेथील रसायन प्रयोगशाळा, वाचनालय व विविध शैक्षणिक उपक्रम अनुभवले. महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी प्रयोग, खेळ व मजेदार सत्रे घेतली. संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मुलांशी संवाद साधला. महाविद्यालयाचे प्राध्यापक खुशाली प्रभू यांनी त्या दिवसाचे आयोजन केले होते. 

कातकरी मुलांनी लुटला समुद्रस्नानाचा आनंद

पेडणे भेटीदरम्यान, कातकरी व इतर शिबिरार्थींनी मोरजी समुद्रकिनारी भेट दिली आणि समुद्रस्नानाचा आनंद लुटला. बऱ्याच कातकरी मुलांसाठी हा अनुभव प्रथमच होता, त्यामुळे त्यांच्यासाठी ही खास पर्वणी ठरली.

बाल लैंगिक शोषणविरोधी जागरुकता कार्यक्रम

शिबिरात एक दिवशी 'अर्ज' संस्थेच्या वतीने दिवसभराचा बाल लैंगिक शोषणविरोधी कृतियुक्त कार्यक्रम घेण्यात आला. खेळ आणि चित्राच्या माध्यमातून अर्जच्या उपसंचालक जुलियाना लोहार, मंजूला श्रींत्रे, मंजू कुवेत व तमन्ना खातून यांनी मुलांना त्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Islamic State Rebels Attack: कांगोमध्ये रक्तपात! चर्चवरील हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, IS समर्थित दहशतवाद्यांचा हात

SCROLL FOR NEXT