Ramanuj Mukherjee Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism Stats Row: गोवा सरकारच्या तक्रारीनंतर रामानुजन मुखर्जी यांची संतप्त प्रतिक्रिया; "हा तर..."

Goa Tourism Row: गोव्यातील टॅक्सी माफिया, महागडे हॉटेल्स, विस्कळीत वाहतूक व्यवस्था यामुळे गोव्यापेक्षा पर्यटक थायलंड आणि श्रीलंकेला जाणे पसंत करत असल्याचे नेटकरी म्हणाले.

Pramod Yadav

Ramanuj Mukherjee On Goa Government Police Complaint

पणजी: कोरोना महामारीनंतर गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या कमी झाल्याची आकडेवारी रामानुज मुखर्जी यांनी X या समाज माध्यमावर शेअर केली. शेअर केलेली आकडेवारी चुकीची आणि दिशाभूल करणारी असल्याचे म्हणत गोवा पर्यटन खात्याने मुखर्जी यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल केलीय. तक्रारीनंतर मुखर्जी यांनी पहिल्यांदाच याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

गोव्याची बदनामी करणाऱ्या छुप्या अजेंड्याचा हा भाग असल्याचा दावा करत पर्यटन खात्याने मुखर्जी यांच्या विरोधात तक्रार दाखल केलीय. पोलिस तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मुखर्जी यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

“गोवा सरकारने माझ्याविरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती मिळाली. हजारो पर्यटकांनी गोव्यातील स्कॅम विरोधात उठवलेल्या आवाजाविरोधात उपाययोजना करण्याऐवजी माझ्याविरोधात तक्रार दाखल करणे दुर्दैवी आहे. पर्यटकांच्या तक्रारीबाबत भाष्य न करता मी केवळ उपलब्ध असणारी सार्वजनिक माहिती शेअर केली. निराधार पोलिस तक्रार दाखल करुन प्रशासन मला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.”

Ramanuj Mukherjee Reply to Goa Govt Police Complaint

“मी शेअर केलेली आकडेवारी चुकीची असल्यास सरकारने योग्य आकडेवारी द्यायला हवी होती पण, तसे न करता कायद्याचा दुरोपयोग करुन टीकाकारांचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मी याविरोधात कायदेशीर लढा देईन”, असे रामानुज मुखर्जी यांनी म्हटले आहे.

पर्यटन खात्याचे उप-संचालक राजेश काळे यांना माझ्या या पोस्टमागे छुपा अजेंडा असल्याचे वाटते, असेही मुखर्जी म्हणाले.

रामानुज मुखर्जी हे आंत्रप्रेन्युअर आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक्स या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर २०१४ ते २०२४ या काळात गोव्यात आलेल्या देशी आणि विदेशी पर्यटकांची आकडेवारी शेअर केली. कोरोना महामारीनंतर (२०१९) गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या घटल्याचे या आकडेवारीत म्हटले आहे.

मुखर्जी यांच्या या पोस्टवर हजारो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. गोव्यातील टॅक्सी माफिया, महागडे हॉटेल्स, विस्कळीत वाहतूक व्यवस्था यामुळे गोव्यापेक्षा पर्यटक थायलंड आणि श्रीलंकेला जाणे पसंत करत असल्याचे नेटकरी म्हणाले.

या पोस्ट आणि प्रतिक्रियांची समाज माध्यांवरुन वृत्तवाहिन्यांनी देखील दखल घेतली. गोवा पर्यटन खात्याने याप्रकरणाची गंभीर दखल पोलिसांत धाव घेतलीय आणि योग्य कारवाईची मागणी केलीय.

रामानुज यांचा थोडक्यात परिचय!

रामानुज मुखर्जी बंगाली युवा उद्योजक असून, गुरुग्राम, हरियाणा येथील एका ट्रेनिंग संस्थेचे प्रमुख आहेत. याशिवाय लॉ सिखो या कायदेविषयक शिक्षण देणाऱ्या संस्थेचे देखील प्रमुखपद सांभाळतात. मुखर्जी यांचा एलएलबीपर्यंत शिक्षण झाले आहे.

पर्यटन खात्याचे स्पष्टीकरण

गोवा आणि श्रीलंका देशाची तुलना होऊ शकत नाही. गोवा भारतातील एक राज्य आहे तर श्रीलंका देश आहे. काही घटकांमुळे विविध गोष्टींच्या किमती वाढतात. राज्यातील पर्यटन अधिक सुलभ करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे पर्यटन खात्याने म्हटले आहे. कोरोना महामारीनंतर राज्याच्या पर्यटनावर परिणाम झालाय खरा पण मी लक्षणीय वाढ देखील झाल्याचे खात्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT