Nagarjuna At IFFI Dainik Gomantak
गोवा

Nagarjuna At IFFI: 'त्यांचे उद्दिष्ट होते की तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी..', नागार्जुनने जागवली वडिलांची हृदयस्पर्शी आठवण

Goa IFFI 2024: इफ्फीत ‘शताब्दी विशेष एएनआर : अक्किनेनी नागेश्वर राव’ यांचे जीवन आणि कार्य यांचा सोहळा’ नामक विशेष सत्राच्या आयोजनाद्वारे भारतीय चित्रपटविश्वातील मान्यवर अक्किनेनी नागेश्वर राव (एएनआर) यांना आदरांजली वाहिली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Nagarjuna At IFFI In Conversation

पणजी: ‘माझ्या वडिलांचे उद्दिष्ट स्पष्ट होते, ते म्हणजे तेलुगु चित्रपट सृष्टीला दखल घेण्याजोगी शक्ती बनवणे,’ तसेच कोणत्याही बाबतीत भाषा हा अडसर नसला पाहिजे, हा त्यांचा विश्वास त्यांच्या काळाच्या कितीतरी पुढचा होता, असे एएनआर यांचे पुत्र अभिनेते नागार्जुन अक्किनेनी यांनी सांगितले.

इफ्फीत ‘शताब्दी विशेष एएनआर : अक्किनेनी नागेश्वर राव’ यांचे जीवन आणि कार्य यांचा सोहळा’ नामक विशेष सत्राच्या आयोजनाद्वारे भारतीय चित्रपटविश्वातील मान्यवर अक्किनेनी नागेश्वर राव (एएनआर) यांना आदरांजली वाहिली आहे. कला अकादमीत आयोजित या सत्रात सुप्रसिध्द अभिनेत्री खुशबू सुंदर एएनआर यांचे पुत्र नागार्जुन यांच्याशी यांनी संवाद साधला.

एएनआर यांचा वारसा आणि तेलुगु चित्रपट सृष्टीला आकार देण्यात त्यांनी बजावलेली महत्त्वपूर्ण भूमिका यांचे दर्शन घडवणारा स्मरणार्थ व्हिडीओ सादर करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. नागार्जुन यांनी त्यांच्या वडिलांच्या हृदयस्पर्शी आठवणी सांगितल्या आणि या उद्योगाबाबत त्यांच्याकडे असलेल्या दूरदृष्टीचे ठळक वर्णन केले.

त्यांनी अन्नपूर्णा स्टुडीओजची स्थापना केली, आजतागायत ही संस्था चित्रपट उद्योगाचा आधारस्तंभ म्हणून काम करत आहे.” तेलुगु चित्रपटविश्वाला अखिल भारतीय स्वरूप देण्यासंदर्भात एएनआर यांच्या दूरदृष्टीवर देखील त्यांनी भर दिला,असेही अभिनेते नागार्जुन म्हणाले.

‘एएनआर’ यांच्यावर माहितीपट!

एएनआर यांच्या चरित्रपटाच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, एका माहितीपटाचे नियोजन करत असल्याची माहिती नागार्जुन यांनी दिली. माहितीपटातून एएनआर यांचे जीवन आणि दूरदृष्टी अधिक चांगल्या प्रकारे चित्रित करता येईल,असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT