केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगाव- हुनगुंड- रायचूर 748ए या महामार्गाच्या चारपदरीकरणाची घोषणा केली आहे. केंद्राने यासाठी 2,675.31 कोटी रुपये मंजूर केले आहेत. कर्नाटकच्या बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्यातून 748ए हा महामार्ग जातो.
एकूण 92.4 किमी लांबीचा हा महामार्ग हायब्रीड ॲन्युइटी मोडद्वारे राबविला जाणार असून, यात सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) चा समावेश आहे.
पणजी - हैद्राबाद इकॉनॉमिक कॉरिडोअरसाठी हा प्रकल्प महत्वाचा असल्याचे वक्तव्य मंत्री नितीन गडकरींनी केले आहे. याद्वारे गोव्यातील पणजी जिथे मासे, पर्यटन, कृषि आणि फार्मा क्षेत्रातील उद्योग आहेत. बेळगावमध्ये अन्नधान्य, साखर, कापूस, तंबाखू, तेलबिया आणि दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तसेच, रायचूर तांदूळ, कापूस, शेंगदाणा आणि डाळींसाठी प्रसिद्ध आहे. तर हैद्राबादमध्ये आयटी क्षेत्र, फार्मा, आरोग्य आणि स्टार्टअप उद्योगाशी निगडीत उद्योग आहेत.
कर्नाटक, गोवा आणि तेलंगणामध्ये असलेल्या या उद्योगांना या महामार्गाचा फायदा होणार आहे.
महामार्गाच्या जलद गतीने बांधकामासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी यांचे हितसंबंध जपत हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल (HAM) वापरले जाते.
खाजगी-सार्वजनिक भागीदारी (PPP) अंतर्गत, प्रकल्प खर्चाच्या 40 टक्के रक्कम बांधकाम कालावधीत सरकारद्वारे प्रदान केली जाईल आणि उर्वरित 60 टक्के रक्कम व्याजासह ऑपरेशन कालावधीत वार्षिक पेमेंट म्हणून दिली जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.