The Central Pollution Control Board Dainik Gomantak
गोवा

Central Pollution Control Board: गोव्यातील दोन आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस!

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमाचे पालन न केल्यामुळे दणका....

दैनिक गोमन्तक

The Central Pollution Control Board: प्लास्टिक कचरा व्यवस्थापन नियमाचे पालन न केल्यामुळे गोव्यातील दोन आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही कारवाई केली केली आहे.

मंडळाने गोव्यातील दोन संस्थांसह भारतभरातील एकूण 688 संस्थांना पुढील कृती करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, होंडा सत्तरी येथील स्वानसन प्लॅस्टिक (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि पिळर्ण औद्योगिक वसाहतील जीकेबी व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड या दोन आस्थापनांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका बसला असून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत पर्यावरण नुकसान भरपाई नियमानुसार 5000 रुपये प्रति टन दंड आकरण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंत्रालयाने 16 फेब्रुवारी 2022 रोजी प्लास्टिक पॅकेजिंगसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये विशिष्ट संस्थांनी ईपीआर पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

ही नोंदणी घेतल्याशिवाय या संस्थांना कोणताही व्यवसाय करण्याची परवानगी नव्हती. याचे पालन न केल्याने देशभरातील अशा संस्थांवर मंडळातर्फे कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT