Ramdas Athawale | ST Reservation in Goa Dainik Gomantak
गोवा

Ramdas Athawale: माझ्या वक्तव्याबद्दल दिलगीर; एसटी समुदायाला विधानसभेत 4 जागा मिळायला हव्यात...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले; एसटी समुदायाची इतकी लोकसंख्या आहे हे महिती नव्हते

Akshay Nirmale

Ramdas Athawale: केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले हे गोवा दौऱ्यावर असताना त्यांनी आज, मंगळवारी एसटी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यात गदारोळ झाला होता. तथापि, आता त्या वक्तव्याबाबत मंत्री आठवले यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

आठवले यांनी एसटी समाज संख्येने जास्त मोठा नाही, त्यामुळे त्यांना विधानसभेत राजकीय आरक्षण मिळणार नाही, असे वक्तव्य केले होते.

दरम्यान, या वक्तव्यावरून गदारोळ झाल्यानंतर मंत्री आठवले यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. एसटी समुदायाची लोकसंख्या गोव्यात १२ टक्के इतकी आहे, याची कल्पना नव्हती.

या समुदायासाठी गोवा विधानसभेत ४ जागा राखीव असल्या पाहिजेत. मी माझ्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, असे आठवले म्हणाले.

त्यावरून गोव्याच्या राजकीय वर्तुळातून आठवलेंसह राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपवर टीका होत होती. तसेच मुख्यमंत्र्यांनी आणि भाजपने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली जात होती.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, मिशन फॉर पॉलिटिकल रिझर्व्हेशन फॉर शेड्युल्ड ट्राईब्ज संघटना आणि काँग्रेसचे एल्विस गोम्स यांनी आठवलेंवर टीका करताना हीच भाजपची खरी भूमिका असून मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी टीका केली होती.

तसेच आठवलेंनी माफी मागवी, अशी मागणीही करण्यात आली होती. दरम्यान, आठवलेंनी यावर स्पष्टीकरण देऊन, तसेच दिलगिरी व्यक्त करून या विषयावर पडदा टाकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT