CM Pramod Sawant
CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

2014 नंतर पहिल्यांदा पर्यटनाचा विचार; 50 वर्षांत झाले नाही ते 8 वर्षांत केले - मुख्यमंत्री डॉ. सावंत

Pramod Yadav

"गोवा देशाची पर्यटन राजधानी व्हावी. पर्यटनाच्या बाबतीत थेट चार्टर फ्लाईट गोव्यात येतात. यातून मिळणाऱ्या परदेशी चलनाचा राज्य आणि देशाला फायदा होतो. तसेच, केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. 2014 नंतर केंद्र सरकारने पहिल्यांदा पर्यटनाबाबत विचार सुरू केला, यापूर्वी कोणत्याच सरकाने त्याचा विचार केला नाही." असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी केले आहे.

टाईम्स नाऊच्या समिट 2022 (Times Now Summit 2022) मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत बोलत होते. 'देशात पर्यटन क्रांती' याविषयावर बोलण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांना आमंत्रित करण्यात आले होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, "स्वदेश दर्शन योजना, प्रसाद योजना यासारख्या योजनांचा संदर्भ यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी दिला. या दोन्ही योजनेतून आम्ही पैसे घेतले असल्याचे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. गोव्यातील आग्वाद जेल, ओल्ड गोव्यातील बॅसिलिका चर्च, फ्लोटिंग जेट्टी यासारख्या गोष्टी आम्ही गोव्यात करू शकलो ज्याचा कधी विचारही केला नव्हता. मागील 50 वर्षांत झाले नाही ते 8 वर्षांत झाले. डबल इंजिन सरकारमुळे हे शक्य झाले." अशी खोचक टीका देखील मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केली.

"मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mopa International Airport) येत्या 11 डिसेंबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान, ही तारिख अद्याप निश्चित नाही. गोव्यात यापूर्वी एकच दाबोळी विमानतळ होते, यामुळे हवाई वाहतूकीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मोपा विमानतळ कार्गेा वाहतूकीसाठी देखील खुले असल्याने याचा गोव्यासह शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला देखील फायदा होईल." असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

"मोपा विमानतळावरती मोठे वाहनतळ सुविधा आहे. विमानतळामुळे गोव्यातील पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे. परदेशी पर्यटकांना याची मोठी मदत होणार आहे. राज्यातील अनेकांचा उदरनिर्वाह पर्यटनावर अवलंबून आहे, त्यामुळे हे विमानतळ महत्वाचे आहे. गोव्यात सध्याच्या घडीला वीस वेगवेगळ्या ठिकाणावरून 60 ते 70 फ्लाईट येतात. नवीन विमानतळामुळे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यात सध्या 73,000 खोल्या राहायला उपलब्ध आहेत. तसेच, खासगी भागिदारी करून अजून क्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: दक्षिणेत भांडवलदार उमेदवार, मित्रांच्या फायद्यासाठी गोव्यात जमिनीचे रूपांतर - पवन खेरा

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Video: ‘’प्रज्वल रेवण्णाला....’’; कर्नाटक सरकारमधील मंत्र्याच्या वक्तव्याने नव्या वादाला फुटले तोंड

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

SCROLL FOR NEXT