Goa Shipyard Dainik Gomantak
गोवा

Goa Shipyard: गोवा शिपयार्ड लिमिटेडकडून केंद्र सरकारला 30 कोटी रुपयांचा लाभांश

Dividend To Central Government: केंद्र सरकारला सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून लाभांश म्हणून 140 कोटी रुपये मिळाले आहेत.

Pramod Yadav

Dividend To Central Government

केंद्र सरकारला सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (CWC), गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड (GRSE) या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून लाभांश म्हणून 140 कोटी रुपये मिळाले आहेत.

यामध्ये अनुक्रमे CWC ने 42 कोटी रुपये, गोवा शिपयार्ड लिमिटेडने 30 कोटी रुपये आणि GRSE ने 68 कोटी रुपये दिले आहेत.

वित्त मंत्रालयाचे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली.

CWC कडून सुमारे 42 कोटी रुपये, गोवा शिपयार्ड लिमिटेडकडून 30 कोटी रुपये आणि GRSE कडून लाभांश म्हणून 68 कोटी रुपये मिळाले आहेत. . DIPAM सचिवांच्या माहितीनुसार, सरकारला एकूण 140 कोटी रुपये लाभांश मिळाला आहे.

सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन हे भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (CPSE) आहे. CWC गोदाम, लॉजिस्टिक व्यवस्थापन आणि संबंधित क्षेत्रात कार्यरत आहे.

तसेच, गोवा शिपयार्ड लिमिटेड ही भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील वास्को द गामा, स्थित एक भारतीय सरकारी मालकीची जहाज बांधणी कंपनी आहे.

तर, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड कोलकाता येथे असून, ही कंपनी भारतीय नौदलाच्या जहाजांपासून व्यापारी जहाजांपर्यंत सर्व काही निर्माण आणि दुरुस्ती करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT