Goa Eco Sensitive Zone Dainik Gomantak
गोवा

Goa Eco Sensitive Zone: अतिप्रदूषणकारी प्रकल्‍पांवर निर्बंध : संजयकुमार शर्मा

स्‍थानिकांनी घाबरून जाऊ नये

दैनिक गोमन्तक

Central Government Team: पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात फक्‍त रेड कॅटगिरीमध्‍ये अतिप्रदूषणकारी प्रकल्‍प आणि मोठ्या प्रमाणात हाती घेतलेले व्‍यावसायिक प्रकल्‍प यांनाच बंदी आहे.

पर्यटनविषयक उद्योगाला या क्षेत्रामुळे कसलीच हानी असणार नाही. त्‍यामुळे स्‍थानिकांनी उगाच घाबरून जाऊ नये, अशी माहिती केंद्रीय समितीचे अध्‍यक्ष संजयकुमार शर्मा यांनी सोमवारी दिली.

या समितीने लाेकांसमोर येऊन या क्षेत्राबद्दल खुलासा करावा, अशी विनंती समाजकल्‍याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी केल्‍यावर समितीच्‍या सदस्‍यांनी जमलेल्‍या लाेकांना या संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली.

सध्‍या फक्‍त सर्वेक्षण चालू आहे. ही जनसुनावणी नव्‍हे. ज्‍यावेळी जनसुनावणी घेतली जाईल त्‍यावेळी स्‍थानिकांना त्‍यांच्‍या सूचना आणि आक्षेप दाखल करण्‍यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असे शर्मा यांनी स्‍पष्‍ट केले.

व्‍यावसायिक प्रकल्‍प नसतील

या संवेदनशील क्षेत्रात थर्मल पॉवर प्‍लांटसारखे प्रकल्‍प येऊ शकत नाहीत. दीड लाख चौ.मी.पेक्षा जास्‍त जमिनीत जर कुणी व्‍यावसायिक प्रकल्‍प बांधत असेल तर त्‍याला निर्बंध आहेत.

वैयक्‍तिक स्‍तरावर २० हजार चौ.मी.च्‍या कमी क्षेत्रात जर बांधकाम करायचे असेल तर त्‍यावर कुठलेही निर्बंध नाहीत, असे संजय कुमार शर्मा यांनी सांगितले.

आमच्या समितीने दक्षिण गोव्यातील अनेक भागांची पाहणी केली आहे आणि लोकांचे मत ऐकले आहे.

कोणताही अहवाल देण्यापूर्वी, स्थानिकांचे जीवनमान, जैवविविधता, व्यवसाय अशा सर्व बाबी विचारात घेतल्या जातील आणि त्यानंतरच आमची समिती शिफारसी करेल, असे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष संजयकुमार शर्मा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

SCROLL FOR NEXT