Loksabha Election Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: आचारसंहितेपूर्वी मतदारसंघ फेररचना आयोग नेमा

Goa Politics: अन्‍याय दूर होण्‍याची आशा : मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन संघटनेची मागणी

दैनिक गोमन्तक

Goa Politics: गोव्‍यातील एसटी समाजाचा न्‍याय हक्‍क असलेले राजकीय आरक्षण हे मागची 20 वर्षे न देता या समाजावर जो अन्‍याय केला होता, त्‍याचे परिमार्जन करण्‍यासाठी आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्‍यापूर्वी केंद्र सरकारने मतदारसंघ फेररचना आयोगाची स्‍थापना करावी.

अशी मागणी मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन या संघटनेने आज केली. हा निर्णय आताच घेतला, तरच 2027 च्‍या विधानसभा निवडणुकीत या समाजाला राजकीय आरक्षण मिळू शकेल, असा विश्वास त्यांनी व्‍यक्‍त केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्‍यासाठी काल नवी दिल्‍ली येथे गेलेल्‍या गोव्‍याच्‍या शिष्‍टमंडळात मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनच्‍या पदाधिकाऱ्यांचा समावेेश होता. केंद्रीय गृहमंत्र्यांनी 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या केंद्र सरकारच्‍या कॅबिनेट बैठकीत हा आयाेग नेमण्‍याचा निर्णय घेतला जाईल.

असे आश्वासन दिले आहे ते त्‍यांनी पाळावे अशीच आमची इच्‍छा आहे, असे यावेळी या संघटनेेचे प्रवक्‍ते गोविंद शिरोडकर यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशनचे अध्‍यक्ष जुवांव फर्नांडिस यांच्‍यासह प्रवक्‍ते गोविंद शिरोडकर आणि अन्‍य पदाधिकारी कॉस्‍तान्‍सियो फालेरो, फ्रान्‍सिस कुलासो, रवींद्र वेळीप आणि जॉयसी रॉड्रीगीस उपस्‍थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: रवी नाईकांनंतर राज्यभरात सर्वमान्य असे नवे नेतृत्व कोण? चाचपणी सुरु; मार्चमध्ये पोटनिवडणूक शक्य

Goa Tiger Reserve: गोव्यात 'डरकाळी' घुमणार की नाही? व्याघ्र प्रकल्पाबाबत केंद्रीय समितीने जाणून घेतले संबंधितांचे म्हणणे

रोजच्या वापरातील खाण्याच्या तेलामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो? अभ्यासातून समोर आली धक्कादायक नवी माहिती

Horoscope: तुमच्या प्रयत्नांना चांगले यश मिळेल,आत्मविश्वासाने पुढे चला; आर्थिक लाभाचे संकेत

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

SCROLL FOR NEXT