केंद्र सरकार राज्य सरकारच्या सहकार्याने गोव्याला कार्गो आणि क्रूझ हब म्हणून विकसित करत आहे. सागरमाला योजनेतर्गंत गोव्यात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनलसह फेरी टर्मिनल उभारण्यात आले आहे. अशी माहीती केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी मंगळवारी (3 डिसेंबर) राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
दरम्यान, केंद्र सरकारने गोव्यातील मुरगाव बंदर 101.72 कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनल तसेच फेरी टर्मिनल विकसित करण्यात आले. सागरमाला परियोजना मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच, केंद्रीय जलमार्ग मंत्रालय गोव्यातील नऊ किनारी जेटींसाठी देखील डीपीआर तयार करत असल्याचे देखील सोनोवाल यांनी पुढे सांगितले.
मालवाहतूक वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये नवीन टर्मिनल्स बांधणे, विद्यमान टर्मिनल्सचा विस्तार करणे, कनेक्टिव्हिटी वाढवणे, सुविधा अपग्रेड करणे, सबसिडी आणि कमी केलेल्या टॅरिफद्वारे तटीय शिपिंगला प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे. क्रूझ सेवेला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 2024 मध्ये 'क्रूझ इंडिया मिशन' सुरु केले, असेही पुढे सोनोवाल यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.