Tanvi Vast Dainik Gomantak
गोवा

Tanvi Vast Case: कोठडीत पोलिसांकडून मारहाण! सेंट्रल बँकेच्या ग्राहकांचे कोट्यवधी रुपये लुबाडणाऱ्या तन्वीचा कोर्टात आरोप

Central Bank Goa Fraud Case: बँक व्यवस्थापक आनंद जाधव याच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचे न्यायालयाला सांगितल्यानंतर त्याची १४ दिवसांच्या रिमांडावर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: सेंट्रल बँकेच्या काकोडा शाखेतील ग्राहकांचे कोट्यवधी रुपये आपल्या खात्यात वळवून सुमारे दीड कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेल्या तन्वी वस्त हिला आज गुरुवारी (०५ डिसेंबर) कुडचडे पोलिसांनी केपे न्यायालयासमोर हजर केले असता, तपासादरम्यान पोलिस कोठडीत असताना कुडचडे पोलिसांनी आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार तिने भर कोर्टात केली. त्यामुळे केपे न्यायालयात एकप्रकारचे वेगळेच वातावरण तयार झाले.

केपेच्या वरिष्ठ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सुमन गाड यांच्यासमोर तन्वी आणि तिचा साथीदार असलेला बँक व्यवस्थापक आनंद जाधव यांना आणले असता, तन्वीने हा आरोप केला. त्यामुळे न्या. गाड यांनी तिला आपल्या कक्षात नेऊन तिची तपासणीही केली.

दरम्यान, केपे न्यायालयाने तन्वीच्या पोलीस कोठडीचा रिमांड दोन दिवसांनी वाढविला आहे. बँक व्यवस्थापक आनंद जाधव याच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचे न्यायालयाला सांगितल्यानंतर त्याची १४ दिवसांच्या रिमांडावर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. या दोघांच्याही जामीन अर्जावर आज न्या. गाड यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली.

या संबंधीचा निकाल शनिवार ७ डिसेंबरपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. आनंद जाधव याच्यावतीने अ‍ॅड. अमेय प्रभूदेसाई तर तन्वी वस्त हिच्यावतीने अ‍ॅड. हेमकांत भांगी यांनी युक्तीवाद केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

कष्टकरी वर्गाच्या आवाजाला मिळाली ताकद, झोहरान ममदानी ठरले आशेचे प्रतीक - संपादकीय

NSA In Goa : गुन्हेगारी कृत्यांवर वचक ठेवण्यासाठी गोवा सरकारने उचलले मोठे पाऊल, राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू

SCROLL FOR NEXT