Babush Monserrate
Babush Monserrate  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयांत आता ‘सीसीटीव्ही’

दैनिक गोमन्तक

पणजी: मामलेदार आणि उपजिल्हाधिकारी कार्यालये ही सामान्य जनतेच्या समस्या सुटण्यासाठी महत्त्वाची ठरतात. या कार्यालयांत विविध कामांसाठी सामान्यांची नेहमी ये-जा असते. या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यात शिस्त व वक्तशीरपणा यावा, सामान्यांची वेळेत कामे व्हावीत, यासाठी आता राज्यातील सर्व कार्यालयांत ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवून ही कार्यालये महसूल मंत्रालयाशी जोडली जातील, अशी घोषणा महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आज (गुरुवारी) केली. येत्या सहा महिन्यांत त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महसूलमंत्री मोन्सेरात म्हणाले, ‘‘येत्या काही दिवसांत महसूल खात्यात अामूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने कुळ मुंडकार प्रकरणे हाताळण्यासाठी प्रत्येक तालुक्यात तीन ते चार मामलेदार असायला हवेत. सध्या ही संख्या कमी आहे. तालुक्यांमध्ये निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी संबंधित मामलेदारांना या कामातच व्यस्त रहावे लागते. त्यामुळे कुळ मुंडकारांचे खटले पडून राहतात. याचा परिणाम या खटल्यांवर झाला असून, अनेक वर्षे हे खटले निकालात निघाले नाहीत. त्यामुळे निर्धारीत वेळेत हे खटले निकालात काढून संबंधितांना न्याय देण्यासाठी खात्यातर्फे तांत्रिक बदल करण्यात येणार आहेत.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: पणजीच्या पोटात दडलंय तरी काय? खोदकामात सापडली आणखी एक रहस्यमय मूर्ती

Goa Congress : निष्ठावंत कार्यकर्ते, प्रतिनिधींची वानवा; काँग्रेसची मोठी पंचाईत

Bicholim News : गोव्याच्या अस्तित्वासाठी झटणार : ॲड. रमाकांत खलप

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News:सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत - अमित पाटकर

SCROLL FOR NEXT