Ponda Police Station  Dainik Gomantak
गोवा

Goa Murder Case: कन्‍हैयाकुमार खून प्रकरणी फोंडा पोलिस स्‍थानकातून सीसीटीव्‍ही फुटेज गायब?

Goa Murder Case: कन्‍हैयाकुमार माेंडल मृत्‍यू प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांनी अपघाती मृत्‍यूची थेअरी बदलून याप्रकरणी खुनाचा गुन्‍हा नोंद केला.

गोमन्तक डिजिटल टीम

कन्‍हैयाकुमार माेंडल मृत्‍यू प्रकरणात मायणा-कुडतरी पोलिसांनी अपघाती मृत्‍यूची थेअरी बदलून याप्रकरणी खुनाचा गुन्‍हा नोंद केला असला तरी २४ जून राेजी त्‍याला फाेंडा पोलिसांनी रॉबर्ट व्‍हॅनमधून पाेलिस स्‍थानकावर आणले होते. यासंबंधीचे सीसीटीव्‍ही फुटेज अद्याप फाेंडा पोलिसांकडून मायणा-कुडतरी पोलिसांना मिळालेले नाही. त्‍यामुळे हे फुटेज उपलब्ध होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. फुटेजअभावी या प्रकरणाचा तपास पुन्‍हा रेंगाळला आहे.

फोंडा येथील हनुमान मंदिराजवळील झोपडपट्टीत राहणाऱ्या कन्‍हैयाकुमारला फोंडा पोलिसांनी २४ जून राेजी ताब्‍यात घेतले होते. २५ जून रोजी त्‍याचा मृतदेह मायणा-कुडतरी पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत येणाऱ्या लाेटली मिसिंग लिंक राेडवर सापडला होता.

या मृतदेहाच्‍या अंगावरून वाहन गेल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍यावर मायणा-कुडतरी पाेलिसांनी या प्रकरणी ‘हिट ॲण्ड रन’ गुन्‍हा नोंद केला हाेता; पण नंतर त्याच्‍या अंगावर तीक्ष्‍ण हत्‍याराने केलेले वार आढळल्‍यामुळे हा घातपाताचा प्रकार असल्‍याचे सिद्ध झाले होते. त्‍यानंतर मायणा-कुडतरी पाेलिसांनी खुनाचा गुन्‍हा नोंद केला होता.

त्‍या दिवशीच्‍या सीसीटीव्‍ही फुटेजचे काय झाले, यासंबंधी फोंड्याचे पोलिस निरीक्षक तुषार लाेटलीकर यांना विचारले असता, मायणा-कुडतरी पाेलिसांनी आमच्‍याकडे ही चित्रफित मागितली आहे. ती त्‍यांना उपलब्‍ध करून देण्‍याची प्रक्रिया सुरू आहे, एवढीच माहिती त्‍यांनी दिली. दरम्‍यान, या प्रकरणात निलंबित केलेल्या फाेंडा रॉबर्ट व्‍हॅनच्‍या तीन कर्मचाऱ्यांची जबानी नाेंदवण्‍यात आली आहे, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे.

ट्रकबाबतही अंदाज चुकला

मिळालेल्‍या माहितीनुसार, या प्रक़रणात मायणा-कुडतरी पाेलिसांनी यापूर्वी एक ट्रक जप्‍त करून गोव्‍यात आणला होता. मात्र, या प्रक़रणाशी या ट्रकचा काहीही संबंध नसल्‍याचे उघड झाल्‍याने पोलिसांचे पथक पुन्‍हा एकदा कर्नाटकात तपासासाठी रवाना झाले होते. आता या पथकाने आणखी एक ट्रक ताब्‍यात घेतला आहे. मात्र हे वाहन कुठे ठेवले आहे, याची अधिकृत माहिती अद्याप पोलिसांनी उघड केलेली नाही.

सांजाव फेस्‍ताचा प्रकरणाशी संबंध?

कन्‍हैयाकुमारचा खून २४ जून राेजी रात्री झाल्‍याचे उघडकीस आले आहे. २४ जून हा सांजाव उत्‍सव साजरा करण्‍याचा दिवस असून या खुनाचा या उत्‍सवाशी काही संबंध तर नाही ना, अशीही शंका सध्‍या व्‍यक्‍त केली जाते. सांजावची पार्टी करून आलेल्‍या एखाद्या गटाची कन्‍हैयाकुमारशी गाठ पडली आणि त्‍यावेळी त्‍यांच्‍यात झालेल्‍या वादावादीत कुणीतरी कन्‍हैयाकुमारला तीक्ष्‍ण हत्‍याराने भाेसकले तर नाही ना, अशी शक्यता असल्याने त्‍यादृष्‍टीनेही पोलिसांनी तपास करावा, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT