Goa Medical College Hospital  
गोवा

गोवा वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमधून चोरीला गेलेल्या बाळाचे सीसीटी फुटेज व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा

बांबोळी: बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या आवारातून चोरीला गेलेला एक महिन्याच्या मुलाचे सीसीटी कॅमेरा फुटेज समोर आले आहे. उत्तर गोव्यातील सर्व पोलिस स्थानकाच्या प्रमुखांची त्यांनी बैठक घेऊन प्रत्येकाला कामे दिली त्यातून बरीच माहिती मिळाली आहे. ही महिला पळून जाऊ नये यासाठी बसस्थानक, टॅक्सी स्टँड, तसेच रेल्वे स्थानकावर पोलिसांना पाठवण्यात आले मात्र तिचा थांगपत्ता लागला नाही. दुपारच्या सुमारास संशयित महिला म्हापसा येथील सर्कलवर बालकाला कपड्यात गुंडाळून बसमधून उतरून जाताना तेथील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत आहे. हा धागा पकडून पोलिस पुढील तपास करीत आहेत. (CCTV footage of baby stolen from Goa Medical College Hospital goes viral)

बांबोळी गोमेकॉच्या परिसरातून 1 महिन्याच्या बाळाचे अपहरण काल दुपारी करण्यात आले. त्यानंतर या बाळांचा शोध सुरू झाला. शोध घेताना अखेर म्हापशातील एका आस्थापनांतील कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये ‘ती’ महिला दिसली.
उत्तर गोवा पोलिस अधिक्षकासह उत्तर गोव्यातील पोलिस स्थानकावरील पोलिस निरीक्षक उपअधीक्षकाच्या पोलिस गाड्यांचा ताफा संध्याकाळी सव्वा सहा च्या सुमारास म्हापसा मारुती मंदिराजवळ धडकला.

बांबोळी म्हापशाच्या दिशेने बालकाचे अपरहण करून ‘ती’ महिला म्हापशाच्या दिशेने आली. संध्याकाळी 3.12 च्या सुमारास खासगी बस मधून लाल रंगाच्या चुडीदार घातलेली महिला बाळासह राम मनोहर लोहिया उद्यानाजवळ बसमधून खाली उतरली व तिने बँक ऑफ इंडियाजवळील रस्ता ओलांडला याचा तपशील मारुती मंदिर व हॉटेल सत्यहिराच्या सी. सी. कॅमेऱ्यामध्ये आढळून आले आहे. त्यानंतर पुढील त्या अपहरण करणाऱ्या महिलेची दिशा शोधण्याचा प्रयत्न रात्री उशिरापर्यंत चालू होता. अनेक आस्थापनाच्या कॅमेऱ्याचे फुटेज गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पाहत आहेत.

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक सक्सेना यांनी सीमेवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले तसेच रेल्वे स्थानकावर सुद्धा नजर ठेवण्याचे आदेश दिले गेले. ज्या खासगी बस मधून अपहरण केलेल्या महिलेने प्रवास केला त्या बसच्या चालक रितेश क‍वठणकर याला बोलावून घेऊन अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला, पण रात्री उशिरा पर्यंत पोलिसांना अपहरण करणाऱ्या महिलेचा शोध लागला नाही. रात्रभर अनेक पोलिस निरीक्षक म्हापशात स्थळ ठोकून होते. पोलिसांना म्हापशातील व्यापारी वर्गाने सी.सी. कॅमेऱ्यावरील फुटेज पाहण्यासाठी रात्री उशिरा आपली आस्थापने उघडून सहकार्य केल्याचे दिसले.

या अपहरण केलेल्या महिलेने सूरज बुक स्टॉल समोर एका दुचाकी वाल्याकडून लिफ्ट घेऊन करासवाड्याच्या दिशेने गेल्याचे समजते. करासवाडा या भागातून कुठल्या दिशेने गेली असेल याचा शोध चालू आहे.
उत्तर गोवा पोलिस अधिक्षक सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक गजानन प्रभू देसाई पोलिस निरीक्षक विजय राणे, तुषार लोटलीकर, नारायण चिमुलकर, कृष्णा सिनारी, सुरेश नाईक, विराज सावंत, संदेश चोडणकर, श्री. लिंगुटकर या विविध पोलिस स्थानकाच्या निरीक्षकांसह गुन्हा अन्वेषक विभागाचे पोलिस उपनिरीक्षक  गडेकर यांच्यासह अनेक पोलिस संध्याकाळी 6 वाजल्या पासून रात्री उशीरा पर्यंत तपासकार्यात मग्न होते.

अपहरणकर्त्या महिलेचा असा प्रवास
इस्पितळाच्या आवारात,  मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षारक्षक तसेच बाहेर असलेल्या टॅक्सी व मोटारसायकल पायलट चालक, तसेच तेथील फळ-भाजी विक्रेत्यांशी बोलल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की, एका महिलेने तोंड चुडीदारच्या ‘स्कार्फ’ने गुंडाळले होते. ती बालकाला घेऊन मोटारसायकल पायलटने गेली. त्यानंतर पणजीहून पुन्हा मोटारसायकल पायलटने पर्वरीपर्यंत गेली. त्यानंतर तिने पर्वरी येथून प्रवासी बस पकडली व म्हापसापर्यंत गेली. तेथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज घेऊन केलेल्या तपासणीत बालकाच्या मातेने वर्णन केलेली महिला एका बालकासह बसमधून उतरताना दिसत असल्याचे आढळून आल्यावर पोलिसांनी म्हापसा परिसर पिंजून काढला. मात्र त्या महिलेचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. 

तपास पथके नियुक्त 
तिसवाडी तालुक्यातील तीन पोलिस स्थानकाच्या प्रमुखांसह विविध पोलिस पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय गुप्तचर यंत्रणेचे पोलिस बालकाला घेऊन फरार झालेल्या महिलेची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. अखेर ती म्हापसा येथे दिसल्याने तेथील पोलिसांना या तपासात सहभागी करण्यात आले आहे. उत्तर गोव्यातील सर्व पोलिस या फरार महिलेच्या शोधात आहेत. 

25 हजारांचा गोमेकाॅला दंड 
गोवा वैद्यकीय महाविद्यालय परिसरात बेजबाबदारपणे वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी गोवा प्रदुषण मंडळाने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाला 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंडळाचे अध्यक्ष गणेश शेटगावकर यांनी सांगितले, की मंडळाच्या अधिका-यांनी संबंधित जागेवर जाऊन पंचनामा केला आहे. वैद्यकीय कचरा फेकल्याचे सिद्ध झाल्याने दंड ठोठावण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

SCROLL FOR NEXT