Satyapal Malik CBI Raid Dainik Gomantak
गोवा

Satyapal Malik CBI Raid: दोन फाईल्ससाठी 300 कोटींची लाच; गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक CBI च्या रडारवर

Satyapal Malik CBI Raid: किश्तवाडमधील या प्रकल्पाच्या जोन फाईलला मंजुरी देण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Pramod Yadav

Satyapal Malik CBI Raid

गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक CBI च्या रडारवर असून, त्यांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरच्या किरू हायड्रो पॉवर प्रकल्पातील गैरव्यवहारप्रकरणी हे छापे टाकले आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

किश्तवाडमधील या प्रकल्पाच्या जोन फाईलला मंजुरी देण्यासाठी 300 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

जम्मू-काश्मीरच्या किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित कथित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने गुरुवारी सकाळी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील निवासस्थान आणि कार्यालयाची झडती घेतली.

याशिवाय केंद्रीय सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील 30 ठिकाणी छापे टाकले. किश्तवारमधील चिनाब नदीवरील प्रस्तावित किरू जलविद्युत प्रकल्पासाठी 2019 मध्ये 2,200 कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट देण्यात झालेल्या कथित भ्रष्टाचाराशी संबंधित ही कारवाई करण्यात आली आहे.

'गेल्या 3-4 दिवसांपासून मी आजारी असून रुग्णालयात दाखल आहे. असे असतानाही सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून माझ्या घरावर हुकूमशहाकडून छापे टाकले जात आहेत.'

'माझा ड्रायव्हर आणि सहाय्यक यांच्यावरही छापे टाकून त्यांना नाहक त्रास दिला जात आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी या छाप्यांना घाबरणार नाही. मी शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे,' असे ट्विट करुन मलिक यांनी सीबीआयच्या छाप्यांबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सत्यपाल मलिक जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित दोन फाईल्स मंजूर करण्यासाठी त्यांना 300 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

मलिक 23 ऑगस्ट 2018 ते 30 ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. गेल्या महिन्यातही केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासासंदर्भात दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील सुमारे 8 ठिकाणी छापे टाकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

IND vs ENG: विकेट मिळाली, पण एक चूक झाली! प्रसिद्ध कृष्णाचा विकेटचा आनंद क्षणातच मावळला; काय झालं नेमकं? पाहा व्हिडिओ

Goa Politics: विरोधकांचे मुद्दे खोडता येतनसल्याने सत्ताधाऱ्यांचा धुडगूस; कार्लुस फेरेरा

Lucky Zodiac Signs: 4 ऑगस्टचा सोमवार खास! 5 भाग्यवान राशींचे नशिब उजळणार; होणार लक्ष्मीचा कृपावर्षाव

SCROLL FOR NEXT