Felix Dahl Case Dainik Gomantak
गोवा

Felix Dahl Case: 2015 साली स्वीडिश नागरिकाचा गोव्यात संशयास्पद मृत्यू, CBI ने दाखल केला क्लोजर रिपोर्ट

फेलिक्स दहल या 22 वर्षीय परदेशी तरूणाचा मृतदेह 28 जानेवारी 2015 रोजी पाटणे काणकोण येथे सापडला होता.

Pramod Yadav

Felix Dahl Case: गोव्यात 28 जानेवारी 2015 रोजी स्वीडिश आणि फिनिश नागरिक फेलिक्स दहल याचा संशयास्पद मृत्यू झाला. फेलिक्स याचा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या शरिरावर जखमांच्या खुना आढळून आल्या होत्या. त्याच्या कुटुंबाने फेलिक्सचा खून झाल्याचा आरोप केला.

दरम्यान, याप्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation (CBI)) विभागाकडे सोपविण्यात आला होता. CBI ने आता या प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.

(CBI filed closure report in Felix Dahl death Case citing lack of evidence )

फेलिक्स दहल या 22 वर्षीय परदेशी तरूणाचा मृतदेह 28 जानेवारी 2015 रोजी पाटणे काणकोण येथे सापडला होता. काणकोण पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु दहलच्या कुटुंबीयांनी फेलिक्सचा खून झाल्याचा आरोप केला होता.

एप्रिल 2018 मध्ये काणकोण पोलिसांनी या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता ज्याच्या विरोधात पीडित दहल कुटुंबाने उच्च न्यायालयात धाव घेतली.

उच्च न्यायालयाने याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सीबीआयला दिले. दरम्यान, पुराव्यांचा अभाव असल्याचे म्हणत सीबीआयने याप्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

फेलिक्स दहल ऑक्टोबर 2014 मध्ये पहिल्यांदा गोव्यात आला होता. फेलिक्स काणकोण येथे राहिला होता. फेलिक्स दहल गोव्यात स्थायिक होण्याचा विचार करत होता असा दावा दहल कुटुंबाने केला. पीडित कुटुंबाच्या म्हणण्यानुसार 26 जानेवारी 2015 रोजी फेलिक्सचा एका स्थानिक व्यक्तीसोबत वाद झाला आणि 28 जानेवारी 2015 रोजी फेलिक्सचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला.

दरम्यान, या गूढ मृत्यूप्रकरणाचा तपास करण्याची जाबाबदारी सीबीआयकडे सोपविण्यात आला होता. पण, या प्रकरणात सीबीआय पुरावे गोळा करू शकली नाही आणि आता काणकोण जेएमएफसी कोर्टात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. सीबीआयने हे प्रकरण बंद करण्याबाबत फिनलंडच्या दूतावासाला देखील कळवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

Goa News Live Updates: पर्ये सुरी हल्ला प्रकरण; आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

Best 5G Smartphones: 30 ते 40 हजारांमध्ये मिळवा टॉप ब्रँड्सचे 'हे' 5G स्मार्टफोन, फीचर्स अन् सर्व डिटेल्स वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT