CBI  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 'रामराज्य', आमच्याकडे भ्रष्टाचाराच्या तक्रारीच नाहीत : CBI

''गोवा राज्यात गेल्या पाच वर्षांमध्ये भ्रष्टाचार विरोधात एकही तक्रार नाही''

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यात गेल्या पाच वर्षांमध्ये भ्रष्टाचार विरोधात एकही तक्रार दाखल झालेली नाही. त्यामूळे सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याने लाच मागितली तर आमच्याकडे तक्रार करा, असे आवाहन केंद्रीय गुन्हे अन्वेषन विभागाने गोवा राज्यातील नागरिकांना केले आहे.

(CBI dipartment said In last 5 years we have not received any complaints of corruption in Goa )

गोवा सीबीआयने गोव्यातील नारिकांना आपल्याकडे कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याने लाच मागितल्यास तक्रार दाखल करा असे म्हटले आहे. गोवा सीबीआयचे पोलिस अधीक्षक आशेष कुमार हे गोव्यातील एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

याबाबत पुढे बोलताना पोलिस अधीक्षक म्हणाले की, आम्हाला माहित आहे बँक कर्मचारी 1 कोटी किंवा त्याहून अधिक कर्ज मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कमिशन घेतात, परंतु गोव्यात अशा बँक कर्मचार्‍यांच्या विरोधात कोणतीही तक्रार केली जात नाही. अनेक अधिकारी येथे महागडे फ्लॅट खरेदी करत आहेत. पण कोणीही तक्रार करत नाही. त्यामूळे नागरिकांनी आता तक्रार करण्यासाठी सकारात्मकता दाखवावी अन्यथा भ्रष्टाचाराला आळा घालता येणार नाही.

राज्यात गेल्या पाच पर्षांपासून एक ही तक्रार दाखल नाही

राज्यात गेल्या पाच पर्षांपासून एक ही तक्रार दाखल झालेली नाही 2018 मध्ये अखेरची तक्रार दाखल झालेली त्यामूळे आमच्या विभागात (CBI )कर्मचारी देखील कमी आहेत. भ्रष्टाचार तक्रारी वाढल्या तरच यात वाढ होऊ शकते असे ही पोलिस अधीक्षक म्हणाले. त्यामूळे नागरिकांनी आता भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात तक्रार करा असं आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT