Cazcar Distillery Bicholim Dainik Gomantak
गोवा

खूषखबर! 'काजू फेणी' जाणार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत; ‘काजकार’ला मिळाले GI Certification

Cazcar Distillery Cashew Feni GI Cerification: जीआय इंडिकेशनखाली काजू फेणीचे उत्‍पादन करणारी डिस्‍टिलरी म्‍हणून डिचोली येथील ‘काजकार’ या डिस्‍टिलरीला जीआय प्रमाणपत्र मिळालेले असून यामुळे आता खऱ्या अर्थाने काजू फेणीला संपूर्ण जगात विक्रीची संधी प्राप्‍त झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Cazcar Distillery Cashew Feni GI Cerification

मडगाव: गोव्‍यातील हेरिटेज ड्रिंक म्‍हणून मान्‍यता मिळालेल्‍या काजू फेणीला जीआय टॅग मिळाल्‍याने आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेची कवाडे, या फेणीसाठी खुली झाली होती. आता त्‍यात आणखी एका खूष खबरीने भर घातली आहे. जीआय इंडिकेशनखाली काजू फेणीचे उत्‍पादन करणारी डिस्‍टिलरी म्‍हणून डिचोली येथील ‘काजकार’ या डिस्‍टिलरीला जीआय प्रमाणपत्र मिळालेले असून यामुळे आता खऱ्या अर्थाने काजू फेणीला संपूर्ण जगात विक्रीची संधी प्राप्‍त झाली आहे.

जीआय इंडिगेशनखालील उत्‍पादन म्‍हणून प्रमाणित झालेली काजकार डिस्टिलरी ही गोव्‍यातील पहिलीच डिस्टिलरी असून याबद्दल मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनीही त्‍यांचे अभिनंदन केले आहे. अस्‍सल फेणी आता लोकांसाठी उपलब्‍ध झालेली असून त्‍याचा फायदा गोव्‍यातील पर्यटनाला, अर्थव्‍यवस्‍थेला होणार असून गोवा स्‍वयंपूर्ण होण्‍याच्‍या प्रवासातील हा महत्‍वाचा टप्‍पा आहे असे मुख्‍यमंत्र्यांनी यासंबंधी ट्‍वीट केले आहे. अबकारी आयुक्‍त अंकिता मिश्रा यांनी हल्‍लीच एका सोहळ्‍यात काजकारचे विप्‍लव भक्‍ता यांना हे प्रमाणपत्र प्रदान केले.

अबकारी अधीक्षक महेश कोरगावकर आणि जीआय इंडिकेशनचे नोडल अधिकारी शांबा नाईक यांच्‍यासह काजकारचे गुरुदत्त भक्‍ता आणि सदानंद नाईक हे उपस्‍थित होते. उत्‍पादनाची पात्रता ठरविणाऱ्या ‍या कॅब या मंडळाकडून या उत्‍पादनाची तपासणी झाल्‍यानंतर आणि या आस्‍थापनाची फेणी जीआय मानांकनाच्‍या दर्जाची असल्‍याचे सिद्ध झाल्‍यानंतरच हे प्रमाणपत्र देण्‍यात आले आहे.

गोवा फेणी धोरण २०२१ साली जारी करण्‍यात आले होते. त्‍यानंतर २००७ मध्‍ये गोव्‍याच्‍या फेणीला जीआय टॅगही प्राप्‍त झाला होता. गोव्‍यात ७०० च्‍या आसपास काजू फेणी बनविणारे कारखाने आहेत. मात्र जीआय इंडिकेशनखाली प्रमाणपत्र मिळविण्‍यासाठी अवघ्‍याच काही कंपन्‍या पुढे आल्‍या होत्‍या. त्‍यापैकी काजकार ही एक कंपनी असून असे मानांकन मिळणारी ही पहिलीच कंपनी ठरली आहे.

अभिमानाची बाब!

काजकारचे गुरुदत्त भक्‍ता म्हणाले, आमच्‍यासाठी ही अभिमानाची बाब आहे. आता आमच्‍या उत्‍पादनावर हे प्रमाणपत्र दिसून येईल. त्‍यामुळे अस्‍सल काजू फेणी आता बाजारात उपलब्‍ध आहे, हा विश्‍वास ग्राहकांमध्‍ये तयार व्‍हायला मदत होणार. उद्या अशा प्रकारच्‍या आणखी जीआय प्रमाणित उत्‍पादन डिस्‍टलरी पुढे आल्‍यास गोव्‍यातील काजू फेणीला निश्‍चितच चांगले दिवस येणार असून त्‍याचा फायदा एकूणच फेणी उद्योगाला होईल, आर्थिक विास होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT