राज्यात मनी माऊ संकटात सापडल्या आहेत. कॅट वायरसची लागण (Cat Virus In Goa) झाल्याने मांजरे पटापट मरू लागली आहेत. मांजराना उलटी होणे, पातळ संडास होणे, संडासात रक्त पडणे ही या रोगाची सामान्य लक्षणे आहे.
मोठ्या प्रमाणात जुलाब व संडास झाल्याने डिहायड्रेशन होऊन मांजराना मरण येते यावर उपाय म्हणून त्यांना ड्रीप लावून त्यांच्या अंगातील पाण्याची पातळी नियंत्रित करता येते. त्याशिवाय तोंडाद्वारे ओआरएस द्रावण देऊनही पाण्याची पातळी नियंत्रित करता येते.हा सांसर्गिक रोग आहे ज्या मांजराला हा रोग झाला आहे, त्याच्या संपर्कात आलेल्या मांजराना या रोगाची लागण होते. मात्र त्यापासून मनुष्याला कोणताच संसर्ग होत नाही.
सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात या रोगाची लागण झालेल्या मांजराना ड्रीप लावून उपचार करण्यात येत असल्याचे सरकारी पशुसंवर्धन खात्यातर्फे चालविण्यात येणाऱ्या पशुवैद्यकीय केंद्राच्या डॉक्टरांनी सांगितले. खाजगी पशुवैद्यकीय दवाखान्यात या रोगाची लागण होऊ नये यासाठी लस उपलब्ध असल्याचे काही खाजगी पशुवैद्यानी सांगितले.राज्यातील अन्य भागाबरोबरच काणकोण, सासष्टी भागात या रोगाला बळी पडून पटापट मरू लागली आहेत.या रोगाची लागण झाल्यानंतर मांजरे अडगळीच्या जागी आसरा घेत असल्याने त्यांच्यावर उपचार करणे कठीण बनते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.