Goa Mandovi river casino start Dainik Gomantak
गोवा

पर्यटकांना गोव्यात ‘हॉली डे’ साठी येता येणार

गोव्यातील कॅसिनो, स्पा, रिव्हर क्रुझ खुले, म्हादाई नदीवरील कॅसिनो सुरू

दैनिक गोमन्तक

पणजी: काही महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेल्या पर्यटकांसाठी (Tourist) आता आनंदाची बातमी आहे. गोव्यात (Goa) कॅसिनो(Casino), स्पा (Spa), रिव्हर क्रुझ (River Cruise) यांनी काही निर्बंध घालून ते खुले करण्याची राज्य सरकारने (Goa Government) परवानगी दिली आहे. त्यामुळे पर्यटकांना आता गोव्यात ‘हॉली डे’ (Holiday) साठी येता येणार आहे.

नव्या एसओपीमुळे राज्यात पर्यटन आणि संबधित व्यवसायांना उभारी मिळणार आहे. राज्यातील कर्फ्यू संपलेला नाही त्यामुळे बहुतेक सर्व उद्योग तसेच व्यापार उद्योग सुरू करण्यास परवानगी देताना सरकारने 50 टक्के क्षमतेची अट ठेवली आहे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. दोन्ही डोस घेऊन 15 दिवस उलटून गेले आहेत किंवा ज्यांनी हे डोस न घेतलेले नाहीत अशांना आरटीपीसीआर चाचणी करुनच कॅसिनो, स्पा तथा मसाज पार्लरमध्ये प्रवेश मिळणार आहे.

केरळमधून येणाऱ्यांसाठी...

केरळमधून येणाऱ्यांना आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्रचे सक्ती आहे. या राज्यातील विद्यार्थी किंवा कर्मचारी यांना किमान पाच दिवस संस्था अलगीकरणात राहणे भाग आहे. अलगीकरणाची व्यवस्था संबंधित संस्था किंवा शाळेला करावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांना संबंधित कार्यालये किंवा कंपन्यानी करावी. पाच दिवसांच्या अलगीकरणानंतर त्यांना आरटीपीसीआर चाचणी करणे भाग आहे. मात्र सरकारी अधिकारी, आरोग्य व्यावसायिक व त्यांच्या पत्नी, 2 वर्षाखालील मुले, वैद्यकीय उपचार किंवा मृत्यू घटना, तीन दिवसांच्या प्रवाशांना, केरळमधून व्हाया गोवा प्रवास करणाऱ्यांना यामधून वगळण्यात आले आहे.

रविवारी दोन बळी; 84 नवे रुग्ण

राज्यात रविवारी कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला तर 84 नवे कोरोनाबाधित आढळून आले. काल 4,178 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. 79 कोरोनाबाधित हे बरे झाले. राज्यात बळींची संख्या आता 3,294 एवढी झाली आहे. कालच्या दिवशी सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 774 आहे. कोरोनाबाधीत बरे होण्याची टक्केवारी 97.68 टक्के आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

Goa Live Updates: एंटर एअरचे पहिले चार्टर गोव्यात दाखल!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

SCROLL FOR NEXT