Casino In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Casino: मोठी बातमी! गोव्यात सोमवारी कॅसिनोही राहणार बंद, राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त निर्णय

अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील कॅसिनो बंद ठेवण्याचा निर्णय

Pramod Yadav

Goa Casino: अयोध्येत होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील कॅसिनो बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी (दि.22) पहाटे 8 ते सायंकाळी 4 या वेळेत कॅसिनोमधील गेम्स बंद राहणार आहेत. कॅसिनो मालकांनी स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे.

अयोध्येत राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहे. केंद्राने सरकारी कर्मचाऱ्यांनी या दिवशी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली असून, गोवा, महाराष्ट्रासह विविध राज्यात देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

गोव्यात सोमवारी शाळा, महाविद्यालये, बँका, सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत. दरम्यान, आता कॅसिनो मालकांनी देखील या दिवशी कॅसिनो बंद ठेवण्याची निर्णय घेतला आहे. या दिवशी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या वेळेत कॅसिनो कामकाज बंद राहणार आहे.

दरम्यान, सोमवारी कॅसिनो बंद राहणार असल्याने या काळात अनेक पर्यटकांची निराशा होणार आहे. पण, सायंकाळी चार नंतर कॅसिनोचे कामकाज पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

याशिवाय गोव्यात समोवारी विविध ग्रामपंचायत क्षेत्रात मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

राज्यातील माशेल, कुंभारजुवे, मये, खांडोळानंतर आता अस्नोड्यातही पंचायत मंडळाने मांसाहारी पदार्थ विक्रीविरोधात गावात नोटीस जारी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: पंजाबची चिवट फलंदाजी! सामना अनिर्णित; 3 गुण कमावत गोव्याची अव्वलस्थानी झेप

Horoscope: सुखप्राप्तीचा दिवस! कार्तिक पौर्णिमा देणार भरभरुन; 'या' राशींसाठी राजयोग

Goa Accident Deaths: चिंताजनक! गोव्‍यात 308 दिवसांत तब्‍बल 216 जणांचे बळी; अपघाती मृत्यूंची वाढती संख्या

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेससाठी फॉरवर्ड भूमिका बदलेल?

AFC Champions League: FC Goa भिडणार रोनाल्डोच्या टीमशी! अल नस्सरविरुद्ध परतीचा सामना; सौदी अरेबियन प्रतिस्पर्ध्यांचे कडवे आव्हान

SCROLL FOR NEXT