Goa Casino
पणजी: मांडवीतील ऑफशोअर कॅसिनोत चौकशी करण्यासाठी आलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाची अडवणूक करुन कथितपणे धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी (१२ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास घडली. पणजी पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर अधिकाऱ्यांना तपास करण्यास मुभा देली. याप्रकरणी आता पणजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पणजी पोलिस स्थानकात 'कॅसिनो प्राइड' चे संचालक, दोन वरिष्ठ कर्मचारी आणि इतर काही कर्माचाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आला आहे.
कॅसिनोतील कर्मचाऱ्यांनी अंमलबजावणी संचालनालयाचे सहाय्यक संचालक पोलुरी चेन्ना केशव राव आणि त्यांच्या टीमवर कथितपणे हल्ला करुन त्यांना एका खोलीत बंद केले, असे अधिकाऱ्यांनी पणजी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपास कामानिमित्ताने गुरुवारी कर्नाटक ईडी कार्यालयाच्या काही अधिकाऱ्यांनी पणजीतील कॅसिनोत धडक दिली. कॅसिनोच्या Bouncers आणि कर्मचाऱ्यांनी ईडी अधिकाऱ्यांची अडवणूक केली. तोतया अधिकारी असल्याचा गैरसमज झाल्याने कॅसिनो कर्मचाऱ्यांनी अडवणूक करुन कारवाई रोखली.
कॅसिनो कर्मचाऱ्यांनी कथितपणे अधिकाऱ्यांवर हल्ला देखील केला. या हल्ल्यात कॅसिनोचे संचालक अशोक वाडिया, वरिष्ठ कर्मचारी गोपाल रामनाथ नाईक, आरती राजा आणि इतर काही जण सहभागी होते, असे तक्रारीत म्हटलंय.
अधिकारी त्यांचे कायदेशीर कर्तव्य बजावत असताना संशयित आरोपींनी तक्रारदार आणि त्याच्या टीमला धमकी देत बेकायदेशीरपणे एका खोलीत कोंडून ठेवले. कॅसिनो संचालक आणि कर्मचाऱ्यांवर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कॅसिनोच्या झडतीदरम्यान गोळा केलेले पुरावे नष्ट केल्याचा आरोपही ईडीने केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.