Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पर्वरीत कॅसिनो व्यावसायिकाला लक्ष्य करून गोळीबार; संचालक थोडक्यात बचावला, हल्लेखोर फरार; दोन दुचाकी पोलिसांच्या ताब्यात VIDEO

Srinivas Naik Shooting In Porvorim: राष्ट्रीय महामार्गालगत पर्वरी येथे कॅसिनो निओ मॅजेस्टीक हॉटेलचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर आज रात्री ८.४५ च्या सुमारास दोन अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळीबाराच्या तीन फैरी झाडल्या.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: राष्ट्रीय महामार्गालगत पर्वरी येथे कॅसिनो निओ मॅजेस्टीक हॉटेलचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर रात्री ८.४५ च्या सुमारास दोन अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळीबाराच्या तीन फैरी झाडल्या. त्यातून नायक बचावले आहेत. ही घटना पर्वरी पोलिस ठाण्‍यापासून २०० मीटर अंतरावर घडली.

मिळालेल्‍या माहितीनुसार, बचावादाखल नायक यांच्या लकी नामक अंगरक्षकाने बंदुकीच्या तीन फैरी हल्लेखोरांच्या दिशेने झाडल्या. त्यापैकी गोळी हल्लेखोरांना लागली की नाही याविषयी माहिती मात्र मिळू शकली नाही; परंतु ते पळण्‍यात यशस्‍वी ठरले. कोणत्या वादातून वा कोणत्या कारणामुळे हा गोळीबार झाला, हे समजू शकले नाही. सीसीटीव्‍हीत संशयितांची छबी कैद झाली असून, दोन दुचाकी जप्‍त करण्‍यात आल्‍या आहेत, अशी माहिती मिळाली.

नेमके काय घडले?

१ नायक हे नेहमीच्या सवयीने रात्री साडेआठ वाजल्‍यानंतर घरी जाण्यास निघाले होते. हॉटेलच्या समोर त्यांची कार उभी होती. ते हॉटेलच्या बाहेर येत असताना त्यांची नजर बंदूक रोखलेल्‍या हल्लेखोरांवर पडली. दोहोंमध्‍ये केवळ ५० ते ६० मीटरचे अंतर होते, असे सांगितले जाते.

२ नायकांच्‍या दिशेने गोळीबार झाला. त्यामुळे ते हॉटेलच्या आत पळाले. प्रत्युत्तरादाखल नायक यांच्या अंगरक्षकाने गोळीबार केल्यावर हल्लेखोर हॉटेलसमोर असलेला महामार्ग ओलांडून पलीकडील बाजूस पळून गेले. तेथून ते दुचाकीकडे पळाल्याची चर्चा आहे.

३ नायक यांनी या घटनेनंतर तातडीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. त्यानंतर काही मिनिटांतच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नायक यांना त्यांच्या निवासस्थानी हलवले आणि तपासास सुरवात केली. त्यांच्या निवासस्थानीही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

४ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून परिसरातील अन्य सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोर कैद झाले आहेत का याची माहिती घेण्यात येत होती. हल्ल्याचे नेमके कारण काय? वैयक्‍तिक शत्रुत्‍व की कॅसिनोतील व्यवहारांवरून हा प्रकार घडला? या अंगाने पोलिसांनी तपास आरंभला आहे. नायक यांची जबानी पोलिसांनी नोंदवून घेतली आहे.

दोन जीवंत काडतुसे जमा

हा हल्‍ला पर्वरी येथील निओ मॅजेस्‍टिक हॉटेलच्‍या आवारातच घडला. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक विश्‍‍वेश कर्पे तसेच पोलिस कुमक घटनास्‍थळी दाखल झाली. परिसरात इतर व्‍यक्‍तींना मज्‍जाव करण्‍यात आला. यावेळी दोन जीवंत काडतुसे जमा करण्‍यात आली. फॉरेन्‍सिक टीमही घटनास्थळी दाखल झाली.

गुंड प्रवृत्तीच्‍या टोळीचा हात?

श्रीनिवास नायक हे पेशाने चार्टर्ड अकौटंट आहेत. ते ‘मॅजेस्‍टिक प्राईड हॉटेल अँड रिसॉर्ट प्रा. लि.चे व्‍यवस्‍थापकीय संचालक (एमडी) आहेत.

ही कंपनी एक जमिनीवरील व एक पाण्‍यातील कॅसिनो चालवते. अलीकडेच या कंपनीच्‍या मालकीचे विभाजन झाले होते.

त्याशिवाय कॅसिनोत अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक येतात. अनेकदा धमक्‍यांसारखे प्रकारही घडतात, अशाच कुठल्‍या तरी टोळीने हल्‍ला केला असावा, अशी शक्‍यता सूत्रांनी व्‍यक्‍त केली आहे.

कायदा व सुव्यवस्थेचे पूर्णपणे अधःपतन

पोलिस ठाण्यापासून अवघ्या काही मीटर अंतरावर घडलेली ही घटना कायदा व सुव्यवस्थेच्या पूर्णपणे झालेल्या अधःपतनाचे भयावह चित्र असल्याची टीका काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

मी कारमध्ये बसणार, तोच माझ्या दिशेने गोळीबार झाला. त्यांनी तीन गोळ्या झाडल्या. माझ्या अंगरक्षकाने त्यांच्या दिशेने तीन गोळ्या झाडताच ते महामार्ग ओलांडून पळून गेले. मी वाचलो, मला दुखापत झालेली नाही.

- श्रीनिवास नायक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nana Patekar Death: सीमापार 'नानां'चं प्रेम! पाकिस्तानी क्रिकेटपटची भावूक पोस्ट; म्हणाला, 'Sir You Will Be Missed''

57th GST Council Meeting: जीएसटी अधिकाऱ्यांच्या अटक अधिकारांवर मर्यादा; कायदेशीर कारवाईची मर्यादा 1 कोटींवरून 5 कोटींवर

Porvorim Firing Case: साधूचा वेश धारण करून कर्नाटकात पळणार होता गोपाळ नाईक; कुळेत पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

VIDEO: पुरुषांच्या टॉयलेटमध्ये चक्क सॅनिटरी पॅड मशीन! महाविद्यालयातील व्हिडिओ व्हायरल होताच नेटकरी चक्रावले; म्हणाले, 'हे काय चाललंय?'

Fake Excise Commissioner: चक्क अर्ध्या दिवसाचा अबकारी आयुक्त बनला तोतया! कर्मचाऱ्यांनीच केला भांडाफोड; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT