Goa Cashew Dainik Gomantak
गोवा

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Cashew Production Decline: गोव्याची ओळख असलेल्या काजू उत्पादनाला गेल्या काही वर्षांत सातत्याने फटका बसत असल्याचे कृषी संचालनालयाच्या वार्षिक आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

२०१९-२० ते २०२५-२६ या सात वर्षांच्या कालावधीत काजू लागवडीखालील क्षेत्र वाढूनही उत्पादनात तब्बल ३,६८३ टनांची घट झाली आहे. २०१९-२० मध्ये राज्यात ५६,४७८ हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड होती आणि २८,६३० टन उत्पादन झाले होते. २०२५-२६ मध्ये लागवडीखालील क्षेत्र वाढून ५६,९३३ हेक्टर झाले. मात्र उत्पादन केवळ २४,९४७ टनांवर आले. म्हणजेच सात वर्षांत लागवड क्षेत्रात ४५५ हेक्टरची वाढ झाली असताना उत्पादनात सुमारे १२.९ टक्क्यांची घट झाली आहे.

२०२३-२४ मध्ये काजू उत्पादन २४,२४० टनांपर्यंत घसरले होते. त्यानंतर २०२४-२५ मध्ये उत्पादनात काहीशी सुधारणा होऊन ते २४,८८२ टन झाले. यंदा म्हणजेच २०२५-२६ मध्ये त्यात आणखी ६५ टनांची वाढ होऊन उत्पादन २४,९४७ टनांवर पोहोचले. मात्र, सात वर्षांपूर्वीच्या तुलनेत हे उत्पादन अद्यापही मोठ्या प्रमाणात कमी आहे.

लागवड क्षेत्रात मोठी घट झालेली नसताना उत्पादनात होत असलेली ही घसरण राज्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. काजू बागांचे योग्य व्यवस्थापन, जुन्या झाडांचे पुनरुज्जीवन, प्रतिहेक्टर उत्पादकता वाढविणे तसेच शेतकऱ्यांना वेळेवर तांत्रिक व कृषी साहाय्य उपलब्ध करून देण्याची गरज या आकडेवारीतून अधोरेखित होते.

हवामानातील प्रतिकूल परिस्थितीचा फटका

यंदाच्या काजू हंगामाच्या सुरुवातीला चांगला मोहोर आल्याने उत्पादनाची आशा वाढली होती. मात्र, दुसऱ्या मोहोराच्या वेळी हवामानातील प्रतिकूल परिस्थितीचा फटका बसला. त्यामुळे पीक काही प्रमाणात घटले. तिसऱ्या पाढ्यात काजू उत्पादकांना तुलनेने समाधानकारक पीक मिळाले. परिणामी २०२४-२५ मधील २४,८८२ टनांच्या तुलनेत यंदा २४,९४७ टन उत्पादन झाले. म्हणजेच वर्षभरात केवळ ६५ टनांची वाढ नोंदविण्यात आली.

उत्पादन घटण्याची प्रमुख कारणे

लहरी हवामानाचा परिणाम : अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार आणि फुलोऱ्याच्या काळातील प्रतिकूल हवामानामुळे मोहोर व फळधारणा कमी होते.

जुन्या झाडांचे प्रमाण अधिक : अनेक काजू बागांमध्ये जुनी झाडे असून त्यांची योग्य निगा राखली जात नाही. त्यामुळे क्षेत्र कायम असले तरी प्रतिहेक्टर उत्पादकता कमी राहते.

कीड व रोगांचा प्रादुर्भाव : विविध किडी आणि रोगांमुळे मोहोर, फळधारणा तसेच काजू बोंडांचे नुकसान होते.

बाग व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष : वेळेवर छाटणी, खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, सिंचन तसेच कीड-रोग नियंत्रण न झाल्यास झाडांची उत्पादकता घटते.

वाढता देखभाल खर्च : मजुरी आणि बागांच्या देखभालीचा खर्च वाढल्याने काही शेतकरी बागांकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. त्याचा थेट परिणाम उत्पादनक्षमतेवर होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT