Goa Cashew Farming Success Story Dainik Gomantak
गोवा

‘काजूच्या झाडाखाली पैसे पेरलेले असतात, ते जो शोधून काढेल तोच राजासारखा जगेल’! वाचा Success Story

Goa Cashew Farming Success Story: यंदा काजू चांगला बहरलेला दिसतो.‌ काजूची बागायती असणारे उत्साहात आहेत. मात्र, बहर चांगला झाला म्हणून उत्पादन चांगले असेल असे नसते.

गोमन्तक डिजिटल टीम

यंदा काजू चांगला बहरलेला दिसतो.‌ काजूची बागायती असणारे उत्साहात आहेत. मात्र, बहर चांगला झाला म्हणून उत्पादन चांगले असेल असे नसते. चांगले उत्पादन हे बहराचे नव्हे तर कष्टाचे फळ असते, हे जो बागायतदार जाणतो तोच त्याचा चांगला आस्वाद घेऊ शकतो.

पार्से येथील माजी सरपंच तथा प्रगतशील शेतकरी श्रीराम साळगावकर व प्रमिला साळगावकर हे दाम्पत्य मागील कित्येक वर्षांपासून डोंगरमाळरानावर काजूबरोबरच वेगवेगळी पारंपरिक शेती उत्पादने घेत असतात. पारंपरिक पद्धतीने काजूच्या बोंडूपासून हुर्राक-फेणी तयार करणे, काजूचा हंगाम संपला की आराम करण्यापेक्षा काजू बागायतीत आणखी कोणते उत्पन्न घेता येईल यासंबंधी विचार कराणे यावर या दाम्पत्याचा भर असतो.

वर्षाचे ३६५ दिवस आपल्या जागेत उत्पन्न घेण्याची त्यांची धडपड सुरू असते. पार्से येथील डोंगरमाळरानावर आपल्या काजू बागायतीमध्ये त्यांनी सात ते आठ जातीची वेगवेगळी काजूची कलमे लावलेली आहेत. त्यात गावठी काजू मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात त्यांना काजू बोंडू मिळतात. साळगावकर म्हणतात, ‘प्रत्येक काजूच्या झाडाखाली पैसे पेरलेले असतात, ते जो कोण शोधून काढेल तोच राजासारखा जीवन जगेल.’

कष्ट कसे करतात, परिश्रम म्हणजे काय आणि त्यातून मग पैसा तयार होतो, हे बाळकडू लहानपणीच मुलांना दिले तर मुलेही या व्यवसायाच्या विचार करू शकतात, असे साळगावकर यांना वाटते. श्रीराम साळगावकर यांनी काजू बागायतीत काजूची कलमे लावण्याचे मार्गदर्शन पत्रादेवी येथील सुप्रसिद्ध काजू बागायतदार मावळणकर यांच्याकडे पाच वर्षे घेतले आहे.

उत्कृष्ट पद्धतीने शेतीबागायती कशी करावी यावर त्यांचा नेहमीच भर राहिलेला आहे. शेतीने आपल्याला नेहमीच हात दिला असून दरवर्षी आपल्या उत्पन्नाचे प्रमाण वाढत असल्याचे ते सांगतात. साळगावकर यांच्या म्हणण्याप्रमाणे, काजूचा व्यवसाय व्यवस्थित करायचा असेल तर आधी काजूच्या झाडांकडे आत्मीयतेने संवाद साधून त्यांची देखरेख बागायतदाराला करावी लागते.

काजूच्या हंगामानंतर, पावसाळ्यात त्या ठिकाणी हळद, वेगवेगळ्या पालेभाज्या यांचे पीक साळगावकर घेतात. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात काजूच्या झाडाखाली आपोआप स्वच्छता राखली जाते आणि काजूच्या हंगामात त्यांना काजूबागायतीची वेगळी साफसफाई करण्याची गरज भासत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT