सांगे: मळकर्णे येथील चिंच, नागवे, ओडशे भागातील डोंगर माथ्यावर आग सोमवारी (14 एप्रिल) दुपारपर्यंत सर्वत्र पसरल्याने येथील काजू बागायतदार संकटात आले आहे. दरम्यान, स्थानिक नागरिक तसेच महिलांनी आग विझविण्याच्या प्रयत्न केला. कुडचडे अग्निशमन दलाने धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक नागरिक रॉय डिकोस्टा यांनी सांगितले की, दरवर्षी जंगलात (Forest) आग लागण्याचे प्रकार या घडतात. कडक उन्ह आणि वाऱ्यामुळे आग सर्वत्र पसरते. यात जंगलाबरोबर काजू बागायतींचेही नुकसान होते. सलग चौथ्या वर्षी अशी घटना घडली आहे. यावर उपाय योजना आखणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
ज्योकी परेरा यांनी सांगितले की, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला जितके शक्य आहे तितके प्रयत्न केले. परंतु जंगलात वाहन नेणे शक्य नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवता येत नाही. दर वर्षी लागणाऱ्या या आगीबाबत शासनाने आवश्यक उपाय योजणे आवश्यक आहे. जंगलात पाण्याची सोय करावी किंव्हा अग्निशमन बंब जाण्यासाठी रस्ता तयार करावा. जेणेकरून जंगलातील जीवजंतू, वनस्पती वाचू शकेल.
स्थानिक महिलांनी (Women) आग लागल्याची माहिती मिळताच आपल्या परीने आग विझविण्यासाठी धाव घेतले. हातात झाडांच्या छोट्या फांद्या घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. कुडचडे अग्निशमन दलातर्फे प्रभाकर वेळीप, संकेत देसाई, सत्यवान गावकर, गिरीश नाईक, आनंद गावकर यांनी आग विझविण्यासाठी मेहनत घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.