Cashew Feni Bottles Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या काजू फेणीला अमेरीकन बाजारपेठ खुली

फेणीला येणारा उग्र वास काढून टाकण्यासाठी संशोधन; चौगुले महाविद्यालयाशी करार

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : गोव्यातील हेरिटेज ड्रिंक म्हणून मान्यता मिळविलेल्या काजू फेणीला आता अमेरिकन बाजारपेठ खुली झाली आहे. मात्र या फेणीला येणारा उग्र वास या पारंपरिक पेयाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळण्यासाठी अडचण ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर हा उग्र वास कमी कसा करायचा यावर संशोधन सुरु झाले असून त्यासाठी अमेरिकेत फेणी निर्यात करणाऱ्या 'काजकार हेरिटेज डिस्टीलरीज' या कंपनीने आज मडगावच्या चौगुले महाविद्यालयाशी सामंजस्य करार केला आहे.

चौगुले महाविद्यालयाच्या मायक्रो बायोलॉजिस्ट डॉ. सुप्रिया खोर्जूवेकर या प्रकल्पाच्या मुख्य संशोधक असून ही फेणी चांगल्या प्रकारे कशी आंबवता येईल यावर त्या गोव्यातील सर्व भागात जाऊन ज्या ठिकाणी काजू फेणी तयार करतात तिथे जाऊन नमुने तपासून एक सर्वमान्य प्रक्रिया तयार करणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यास गोव्यातील काजू फेणीला आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखी मागणी वाढणार आहे.
काजकारचे व्यवस्थापकीय संचालक गुरुदत्त भक्त आणि चौगुलेच्या प्राचार्य डॉ. शैला घंटी यांनी आज या करारावर सह्या केल्या. यावेळी प्रमुख संशोधक डॉ. खोर्जूवेकर, काजू फेणी उत्पादक संघटनेचे सचिव हेंझिल व्हाझ, अबकारी खात्याचे अधिकारी शांबा नाईक तसेच विज्ञान व तंत्रज्ञान खात्याचे दीपक परब हे उपस्थित होते.

काजकार कंपनीच्या फेणीला अमेरिकेत मोठी मागणी आहे. मात्र त्यासाठी त्यांना चार वर्षे अक्षरशः घाम गाळावा लागला. या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काजू फेणीला आणखीन मागणी वाढणे शक्य आहे. मात्र त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची फेणी गोव्यात उत्पादित करण्याची गरज आहे. गोव्यात वेगवेगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने फेणी गाळली जाते. त्यामुळे फेणीच्या दर्जात फरक सापडतो. हा फरक दूर करून विदेशी बाजारपेठेची मागणीची पूर्तता होणारी फेणी कशी तयार करता येईल. त्यासाठी हे संशोधन हाती घेतल्याचे भक्त यांनी सांगितले. या संशोधनातून फेणी तयार करण्यासाठी उत्तम यीस्ट तयार करण्यावर आमचा भर असेल असे डॉ. खोर्जूवेकर यांनी सांगितले.
जगात आज स्कॉच, व्हिस्की आणि तकीला या पेयांना जशी मान्यता मिळाली आहे तशीच मान्यता आम्हाला फेणीला मिळवून द्यायची आहे. यात गावातील फेणी गाळणाऱ्या उत्पादकांना सामावून घेऊन त्यांच्याही उत्पादनाला चांगली किंमत कशी मिळणार यासाठी आमचे प्रयत्न चालू असतील, असे हेंझिल व्हाझ यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

SCROLL FOR NEXT