Cashew business Goa Dainik Gomantak
गोवा

Cashew Farming: ‘काजू’ पिकाला हवामानाचा फटका, फलधारणेला झाला उशीर; हातभट्ट्यांची धगधग अजूनही शांतच

cashew farming in Goa: काजू पिकाला मोहर येण्यासाठी थंडीची आवश्यकता असते; पण यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने थंडीही लांबली.

Sameer Panditrao

Weather effects on cashew yield

पेडणे: शेती व्यवसायाबरोबर काजू व्यवसाय हा पेडणे तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय. या हंगामात शेतीची कामे नसल्याने काजू व्यवसाय चांगल्याप्रकारे करता येतो; पण बदलत्या हवामानाचा यंदा काजू व्यवसायावर परिणाम झाला असून तालुक्यात काजूचा हंगाम अजून सुरू झालेला नाही.

अद्याप कलमी काजू बागायतीची झाडे वगळता अन्य काजू बागायतीत कुठेतरी अपवादात्मक काजू बोंडू लागलेले दिसतात. काजू पिकाला मोहर येण्यासाठी थंडीची आवश्यकता असते; पण यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने थंडीही लांबली.

यामुळे काजूच्या झाडांना मोहर येण्यास उशीर झाला. नंतर फलधारणेसाठी उष्णतेची आवश्यकता असते. गेल्या दोन आठवड्यांपासून उष्णता जाणवल्यानंतर काजू बोंडूची फलधारणा नुकती कुठे तरी सुरू झाली आहे. काजूचे पीक लांबणीवर पडल्याने अजूनपर्यंत तालुक्यात कुठे काजू बोंडूचा रस गाळण्यासाठी हातभट्ट्या लावतानाचे चित्र दिसत नाही.

पेडणे तालुक्याला सिंधुदुर्ग जवळ असल्याने तसेच सिंधुदुर्ग-महाराष्ट्रमध्ये काजू फेणी काढण्यासाठी मान्यता नसल्याने पेडणे तालुक्यातील बहुतांश काजू फेणी गाळणारे व्यावसायिक सिंधुदुर्गमधून काजू बोंडू आणतात; पण सध्या सिंधुदुर्गमध्येही अशीच परिस्थिती असल्याने येथे हातभट्ट्या लावणे शक्य झालेले नाही.

हुर्राक, ३५ लिटरचा कॅन ३००० रुपये

१. तालुक्यात काही कुटुंबे ही हुर्राक, फेणी गाळण्याचा व्यवसाय करतात व यातून होणाऱ्या कमाईवर वर्षभर आपली उपजीविका करतात. काही कुटुंबे भाडेपट्टीवर काजू बागायती घेतात. जिथे काजू बागायती कलमांची झाडे आहेत, तिथे मात्र पंधरा-वीस दिवसांपूर्वी काजू बोंडू लागण्यास सुरुवात झाल्याने हातभट्ट्या सुरू होऊन हुर्राक गाळण्यास सुरुवात झाली आहे.

२.सध्या गाळण्यात आलेल्या हुर्राकाचा दर हा ३५ लिटरच्या कॅनसाठी ३००० रुपये असा आहे. हुर्राकनंतरची फेणी ही प्रक्रिया. मात्र, काजू फेणी गाळण्यास अद्याप कुठेही सुरवात झालेली नाही. काजू पिकाला अद्याप जोमदार सुरवात न झाल्याने तालुक्यात दुकानावर कुठेही काजूबिया खरेदी करणे अजून सुरू झालेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: नो पार्किंगचा फलक काय कामाचा!

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

Quepem: भले मोठे झाड कोसळले, घराच्या 6 खोल्या जमीनदोस्त; केपेतील दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

SCROLL FOR NEXT