पणजी: गोव्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय म्हणजे शेती-बागायती. त्यांच्यासाठी काजूचे पीक सर्वात महत्वाचे असते, मात्र वातावरणातील बदलामुळे काजूच्या पिकाला मार बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या गोव्यातील दमट हवामानामुळे काजूच्या मोहोराला टी मॉस्क्युटो, तर आंब्याच्या मोहोराला मँगो हॉपर किटाणूची लागण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे, यावर आयसीएआरचे वैज्ञानिक डॉ. ए. आर. देसाई यांनी काही स्पष्टीकरण दिले.
गोव्यातील एका मराठी वृत्तपत्राने जाहीर केलेल्या माहितीनुसार डिसेंबर आणि जानेवारीचा महिना हा काजू आणि आंब्याच्या पिकासाठी फार महत्वाचा असतो. याकाळात हवामानातील घटकांमुळे काजू आणि आंब्याच्या पिकांना मोहर धरतो, मात्र अचानक तापमान वाढल्यास किंवा दमट झाल्यास याच मोहोराला कीड लागू शकते. परिणामी मोहोर खराब होतो आणि गळून पडतो.
तापमान वाढल्याने टी मॉस्क्युटो नावाची एक कीड निर्माण होते जी मोहोरातील रस ओढून घेते, यानंतर मोहोर काळा पडायला सुरुवात होते जे पिकाच्या दृष्टीने चांगलं नाही. हवेत गारवा असल्यास हि कीड धरत नाही आणि म्हणून काजू किंवा आंब्याच्या पिकासाठी वातावरणात थंडी महत्वाची असते.
गोव्यात साधारण नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरूवात होते, मात्र यंदा असे झाले नाही. डिसेंबरमध्ये आलेला मोहोर पाहिलं पीक देतो कारण त्यानंतर येणाऱ्या मोहोराकडून पीक मिळवण्यास बराच काळ जाणं बाकी असतं. सध्या गोव्यात म्हणावं तसं पोषक वातावरण नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. गोव्यात दरवर्षी सरासरी २५ ते २६ हजार टन काजूचे पीक तयार होते. एप्रिल आणि मे गोव्यातील काजूच्या पिकासाठी महत्वाचे असतात मात्र यंदाच्या वर्षी हवामानामुळे फटका बसू नये म्हणून शेतकरी चिंतेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.