Cash For Job Uma Patil Case
वास्को: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून पैसे लाटल्याप्रकरणी अटक केलेल्या उमा पाटीलचे कारनामे हळूहळू बाहेर येऊ लागले आहेत. सख्खे भाऊ आणि बहिणीच्या मुलांनाही नोकरी देण्याचे आमिष दाखवून तिने १३ लाखांहून अधिक रक्कम घेतली होती. याप्रकरणी त्यांनी वास्को पोलिसांत चौथी तक्रार शुक्रवारी रात्री उशिरा दाखल केली. पोलिसांनी उमा पाटील हिच्या दोन मिनी बसगाड्या, तीन चारचाकी गाड्या आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
उमाची बहीण कारवार येथे, तर भाऊ बायणा येथे राहतो. भावा-बहिणीच्या मुलांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून उमाने तेरा लाख रुपये घेतले; परंतु आजतागायत नोकरी दिली नाही, शिवाय पैसेही परत केले नाहीत. बहीण-भाऊ इतके दिवस गप्प होते. आता त्यांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
आल्तो-दाबोळी येथील गीतेश गोपाल नाईक यांना आरटीओत तर त्यांची पत्नी सोनाली यांना विद्युत विभागात नोकरी देण्याच्या बहाण्याने १८ लाख ४५ हजार रुपये उकळल्याप्रकरणी आरोपी शिवम पाटील आणि उमा पाटील यांच्यावर वास्को पोलिसांनी आज पाचवा गुन्हा नोंद केला.
आपण एका मानवाधिकार संस्थेची अध्यक्ष असल्याचे उमा सांगत होती. तशा आशयाचे फलकही तिने आपल्या फ्लॅटच्या गॅलरीबाहेर लावले होते. आपले समाजात वजन आहे, हे दाखविण्यासाठी ती काहीवेळा सण-उत्सवांवेळी आपल्या छबीसह भव्य शुभेच्छा फलक बायणा-मांगोरहिल भागात लावत असायची.
उमाने फक्त नोकरी देण्याचे आमिष दाखविले नाही, तर ज्यांना फ्लॅट, प्लॉट पाहिजे होते, त्यांनाही आपल्या जाळ्यात ओढून फसवणूक केली. ज्यांना स्वस्तात फ्लॅट, प्लॉट पाहिजे, त्यांना कोणाचा तरी प्लॉट, फ्लॅट दाखवून ती आगाऊ रक्कम म्हणून पैसे घेत असे. अशा पद्धतीने तिने अनेकांची फसवणूक केली आहे. एका व्यक्तीने तिच्याविरोधात यासंबंधी तक्रार केली होती. तथापि, हे प्रकरण गांभीर्याने घेतले नव्हते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.