Sagar Naik Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: सागर नाईकविरोधात आणखी एका गुन्ह्याची नोंद; 10 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप

Sagar Naik: सावर्डे येथील सदानंद विठु विर्नोडकर यांना नोकरीचे आमिष दाखवून 10 लाखांचा गंडा घातला. फोंडा पोलिसांनी सागर नाईकला ताब्यात घेवून रिमांडसाठी न्यायालयात हजर केले आहे.

Manish Jadhav

शिक्षिकेच्या नोकरीचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या दीपाश्री सावंत गावस ऊर्फ दीपाश्री प्रशांत म्हातो हिला न्यायालयाने मोठा दणका दिला. न्यायालयाने दिपाश्रीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यातच आता, दीपाश्रीचा सहकारी सागर नाईक याच्याविरोधात फोंडा पोलिस ठाण्यात आणखी एका गुन्ह्याची नोंद झाली आहे. सावर्डे येथील सदानंद विठु विर्नोडकर यांना नोकरीचे आमिष दाखवून त्याने 10 लाखांचा गंडा घातला. फोंडा पोलिसांनी सागर नाईकला ताब्यात घेवून रिमांडसाठी न्यायालयात हजर केले आहे. या प्रकरणात सुरुवातीला आयआरबी पोलिस असलेल्या कुर्टी-फोंडा येथील सागर सुरेश नाईकला अटक करण्यात आली होती.

गावकरवाडा-उसगावातील एका महिलेला शिक्षिकेची नोकरी देण्याच्या बहाण्याने 15 लाखांचा हा व्यवहार झाला होता. त्यात दीपाश्री हीच मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणात सुरुवातीला आयआरबी पोलिस असलेल्या कुर्टी-फोंडा येथील सागर सुरेश नाईक याला अटक करण्यात आली होती. चौकशी दरम्यान माशेल येथील विद्यालयातील शिक्षिका सुनिता शशिकांत पावसकर हिचे तसेच दीपाश्रीचे नाव संशयित सागर नाईक याने घेतल्याने सुनिता पावसकर हिला 28 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. मात्र सुनिताला अटक झाल्याचे समजताच दीपाश्री फरार झाली होती.

दुसरीकडे, कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणी पूजा नाईक हिला दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाच दिवसांच्या कोठडीचा रिमांड संपल्यानंतर सोमवारी (4 नोव्हेंबर) पूजा हिला डिचोलीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pramod Sawant: कॅनडातील हिंदू मंदिरावरील हल्ल्यावरुन संतापले गोव्याचे मुख्यमंत्री; शांतता आणि एकतेवर हल्ला असल्याची टीका

Panaji: अजगराला फरफटत नेणे, ओढून त्रास देणे भोवले; वन विभागाने घेतली दखल, गुन्हा नोंद

Cuchelim Comunidad: 140 बांधकामांवर फिरणार बुलडोझर! कुचेली कोमुनिदाद जागेत अतिक्रमण; उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

गोव्यातील बेकायदेशीर घरांना वीज आणि पाणी कनेक्शन मिळणार नाही: मुख्यमंत्री सावंत असं का म्हणाले?

Goa Opinion: कुछ भी करो, चलता है! गोव्याला जबाबदार पर्यटक अन् कठोर नियमांची गरज

SCROLL FOR NEXT