Cash For Job Dainik Gomantak
गोवा

Pooja Naik: '..आमचे पैसे परत मिळवून द्या'! Cash For Job प्रकरणी फसवणूक झालेल्यांचे CM सावंतांसमोर गाऱ्हाणे; Watch Video

Pooja Naik Cash For Job: कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील प्रमुख संशयित पूजा नाईक हिच्याकडे सरकारी नोकरीसाठी पैसे दिलेल्या लोकांनी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात हजेरी लावली.

गोमन्तक डिजिटल टीम

साखळी: कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील प्रमुख संशयित पूजा नाईक हिच्याकडे सरकारी नोकरीसाठी पैसे दिलेल्या लोकांनी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात हजेरी लावली.

त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेत आमचे पैसे मिळवून द्या, आमची या प्रकरणात फसवणूक झाली आहे, अशी विनंती केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना, आपल्या जवळच्या पोलिस स्थानकावर पूजा नाईक हिच्या विरोधात तक्रार दाखल करून पुरावे सादर करण्याची सूचना केली.

पूजा नाईक हिने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत आपण लोकांकडून गोळा केलेले पैसे एक मंत्री व दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले होते. या अधिकाऱ्यांनी जर आपले पैसे परत केले नाही, तर त्यांची नावेही जाहीर करण्याचा इशारा दिला होता.

त्यानुसार पूजाने पोलिसांकडे संबंधित मंत्री आणि दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे उघड केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच पूजा नाईकने ‘आप’चे गोवा राज्य निमंत्रक ॲड. अमित पालेकर यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याच आधारे या प्रकरणात तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर,

आयएएस अधिकारी निखिल देसाई, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांची नावे जाहीर केली होती. मंत्री सुदिन ढवळीकर यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांची ओळख करून दिली होती, असे पूजाने उघडपणे सांगितल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

सरकारी नोकरीसाठी पैसे देणारे लोक पूजाच्या घरी गर्दी करत आहेत. फोनवरूनही वारंवार पैशांची मागणी केली जाते. पूजाकडून पैसे परत मिळणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता फसलेल्या सर्व लोकांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले.

लोकांच्या तक्रारींची चौकशी करू

याप्रश्‍नी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की तुम्ही पूजा नाईकला रोख पद्धतीने पैसे दिले असतील तर त्याचा कोणताही लेखी पुरावा सापडणार नाही. त्यामुळे या प्रकरणात सर्वांनी आपापल्या जवळच्या पोलिस स्थानकात पूजा नाईकविरोधात तक्रार करावी. तसेच जे काही पैसे दिल्याचे पुरावे असतील ते पोलिसांसमोर सादर करावेत. या प्रकरणाची चौकशी सध्या गुन्हा अन्वेषण विभागातर्फे सुरू आहे. सध्या पूजा जी काही वक्तव्ये करत आहे, ती निराधार असून लोकांच्या तक्रारीनुसार पुढील चौकशी केली जाईल.

माफी माग, अन्यथा फौजदारी कारवाई : निखिल देसाईंची पूजाला नोटीस

पूजा नाईक हिने ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात नाव घेतलेले आयएएस अधिकारी निखिल देसाई यांनी तिला कायदेशीर नोटीस बजावली आहे. ७२ तासांत लिखित स्वरूपात आणि प्रसार माध्यमांसमोर सार्वजनिक माफी मागावी. अन्यथा फौजदारी कारवाई करू, असा इशाराही त्‍यांनी नोटिशीद्वारे दिला आहे.

देसाई यांचे वकील ॲड. जोनाथन जॉर्ज यांनी ही नोटीस बजावली आहे. मी गेली अनेक वर्षे सरकारी सेवेत आहे. आतापर्यंत माझ्यावर भ्रष्‍टाचाराचा एक डागही नाही. तरीही पूजा नाईक हिने कोणतेही पुरावे नसताना माझ्यावर जे आरोप केले आहेत, ते पूर्णत: खोटे आहेत. त्‍यामुळे तिने जाहीर माफी मागावी. अन्‍यथा फौजदारी कारवाई करू, असे देसाई यांनी नोटिशीत म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kamini Kaushal: 1948 ते 2022! मनोजकुमारचा शहीद ते आमीरच्या लालसिंग चढ्ढापर्यंत कार्यरत असणारी अभिनेत्री 'कामिनी कौशल'

Umrah Pilgrims Accident: सौदी अरेबियात भीषण अपघात! मदिनाजवळ टँकरला धडकून बसला आग, 42 भारतीय यात्रेकरूंचा दुर्दैवी मृत्यू

Bihar Election Goa Impact: गोव्याच्या दृष्टीनेही 'बिहार' निकालाचा विचार करणे गरजेचे..

Mhadei Land: 'गोवा मुक्तीच्या आधीपासून लोक इथे राहताहेत'; घर, उत्पन्नाची जागा सोडून अभयारण्य निश्चित करा; म्हादईतील भूमिपुत्रांची मागणी

'यापुढे पारंपरिक सहकारी संस्थांना परवानगी देण्यात येणार नाही'! CM सावंतांचे प्रतिपादन; कर्ज बुडव्‍यांचे प्रमाण वाढल्याचा दावा

SCROLL FOR NEXT