Goa job scam Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: सरकारी नोकरी घोटाळा प्रकरण; पर्वरी पोलिसांकडून पूजा नाईक विरोधात 113 पानी आरोपपत्र दाखल

Government Job Fraud: कॅश फॉर जॉब’ घोटाळाप्रकरणी पर्वरी पोलिसांनी पूजा नाईक हिच्यासह तिघांविरुद्ध म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात ११३ पानी आरोपपत्र दाखल केले

Akshata Chhatre

पणजी: ‘कॅश फॉर जॉब’ घोटाळाप्रकरणी पर्वरी पोलिसांनी जुने गोवे येथील संशयित पूजा नाईक (३९) हिच्यासह तिघांविरुद्ध म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात ११३ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात ६ साक्षीदारांचा समावेश आहे. या आरोपपत्रामध्ये प्रियोळ - म्हार्दोळ येथील संशयित अजित सतरकर (४९) व अनिशा सतरकर (४७) यांचा समावेश आहे.

या दोघांनी सरकारी खात्यात नोकरी मिळवून देण्यासाठी प्रिया मांद्रेकर हिच्याकडून ४ लाख रुपये घेतले होते. तिने स्वतःच्या पतीच्या बँक खात्यावरून ही रक्कम अजित व अनिशा सतरकर याच्या बँक खात्यावर जमा केली होती. ही रक्कम नोव्हेंबर २०२१ मध्ये दिली होती. मात्र, सरकारी नोकरी देण्यात ते अपयशी ठरले होते.

तक्रारदाराने ही रक्कम परत करण्यास सांगितली. मात्र, ती दिली गेली नाही. त्यामुळे तिने पर्वरी पोलिस स्थानकात या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पोलिस चौकशीवेळी या दोघांनी ही रक्कम संशयित पूजा नाईक हिच्याकडे सोपविली अशी महिती दिली. त्यामुळे या तिघांनाही अटक करण्यात आली होती.

पूजा नाईक हिच्या विरोधात अशा प्रकारचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डिचोली पोलिसांनी तिला २९ ऑक्टोबर २०२४ रोजी अटक केली होती आणि त्यानंतर पूजाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी पूजा नाईक हिने प्रिया अरविंद मणेरकरला नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे प्रकरण उघड झालं होतं आणि पर्वरी पोलिसांनी तिला ६ नोव्हेंबर २०२४ रोजी अटक केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Liquor Smuggling: गोव्यातून गुजरातला दारुतस्करी! 1.43 कोटींचा मद्यसाठा जप्त; पिसुर्लेतील डिस्टिलरी सील, 9 जण अटकेत

Mapusa: पाणीपुरवठा ऑफिसमध्ये नेल्या गढूळ पाण्याच्या बाटल्या! म्हापशातील प्रश्न ऐरणीवर; काँग्रेसचा घागर मोर्चाचा इशारा

Reis Magos: रेईश मागूशमधील प्रकल्प DLF ने गुंडाळला? ‘रेरा’कडे नोंदणी मागे घेण्यासाठी अर्ज; 80 बंगल्यांची नोंदणी होणार रद्द

Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

SCROLL FOR NEXT