Cash For Job Scam Pooja Naik
पणजी: सरकारी नोकरीचे आमिष देऊन अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या कॅश फॉर जॉब घोटाळा प्रकरणातील मुख्य सुत्रधार पूजा नाईकला अखेर जामीन मंजूर झाला आहे. पूजा नाईक विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पणजी पोलिस ठाण्यात सुरुवातील तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद आहे.
गोव्यात गेल्या एक महिन्यापासून Cash For Job Scam गाजत आहे. या प्रकरणात पूजा नाईक मुख्य सुत्रधार असून, तिला सुरुवातीला पोलिस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, आता तिला जामीन मंजूर झाला आहे. पूजा विरोधात पणजी, म्हार्दोळ, पर्वरी आणि डिचोली पोलिस स्थानकात गुन्हे दाखल आहेत.
पूजाने अनेकांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळ्याचा आरोप आहे. यात तिच्यासोबत सरकारी अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणात दोन सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग उघडकीस आला. यातील श्रीधर सतरकर यांनी आत्महत्या करत जीवन संपवले होते.
श्रीधर सतरकर यांच्या आत्महत्या प्रकरणात पूजा नाईक पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी सुनावली गेली. दरम्यान, आता पूजा नाईकला जामीन मंजूर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून पूजा जामिनासाठी धडपड करत होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.