North Goa Court Dainik Gomantak
गोवा

North Goa Court: मंत्री बाबूश आणि माविन यांच्‍या विरोधातील खटले उत्तर गोव्‍यातील न्‍यायालयात वर्ग

North Goa Court: खटले यापुढेही न्‍या. आगा यांच्‍यासमोरच सुनावणीस येणार आहेत.

सुशांत कुंकळयेकर

North Goa Court

राजकारण्‍यांच्‍या विरोधातील खटले हाताळण्‍यासाठी खास न्‍यायाधीश म्‍हणून नियुक्‍त केलेले न्‍या. इर्शाद आगा यांची बदली उत्तर गोव्‍याचे प्रधान सत्र न्‍यायाधीश म्‍हणून झाल्‍याने मंत्री बाबुश मोन्‍सेरात आणि मंत्री माविन गुदिन्‍हो यांच्‍या विरोधात दाखल केलेले खटले आता उत्तर गोव्‍यातील न्‍यायालयात वर्ग करण्‍यात आले आहेत. हे खटले यापुढेही न्‍या. आगा यांच्‍यासमोरच सुनावणीस येणार आहेत.

बाबूश मोन्‍सेरात यांच्‍या विरोधात अल्‍पवयीन मुलीवरील बलात्‍कार प्रक़रण आणि पणजी पोलीस स्‍थानक हल्‍ला प्रकरण अशा दोन खटल्‍यांची तर मॉवीन गुदिन्‍हो यांच्‍या विरोधात वीज बील सवलत घोटाळा प्रकरणाची सुनावणी चालू हाेती.

आता ही तिन्‍ही प्रक़रणे पणजीतील न्‍यायालयात सुनावणीसाठी येणार आहेत. त्‍याशिवाय दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्‍या विरोधात चांदर रस्‍ता रोको प्रकरणात मडगावच्‍या प्रथम वर्ग न्‍यायालयात चालू असलेल्‍या प्रक़रणाची सुनावणीही न्‍या. आगा यांच्‍यासमोर सुनावणीस येणार आहे.

आज मोंसेरात यांच्‍या विरोधातील दोन तर गुदिन्‍हो यांच्‍या विरोधातील एका खटल्‍याची सुनावणी होती. त्‍यासाठी अभियोग पक्षाचे वकील दक्षिण गोव्‍याच्‍या प्रधान सत्र न्‍यायाधीश शेरीन पॉल यांच्‍यासमोर हजर झाले असता, त्‍यांनी न्‍या. आगा यांची अशी प्रक़रणे हाताळण्‍यासाठी खास न्‍यायाधीश म्हणून नियुक्‍ती केली असल्‍यामुळे यापुढे या सर्व प्रकरणांच्‍या सुनावण्‍या त्‍यांच्‍या पणजी येथील न्‍यायालयात चालू रहातील असे स्‍पष्‍ट केले.

गुदिन्‍हो प्रक़रणाची पुढील सुनावणी 28 जून रोजी तर बाबुश माेंसेरात यांच्‍या विराेधातील कथित बलात्‍कार प्रक़रणाची सुनावणी 01 जुलै रोजी ठेवण्‍यात आली असून त्‍या तारखेला अभियोग आणि बचाव पक्षाने पणजी न्‍यायालयात उपस्‍थित रहावे असे त्‍यांना कळविण्‍यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bordem: 'हा आमच्या जीवाशी खेळ'! बोर्डे-डिचोलीत गटारात टाकली जलवाहिनी; संतप्त नागरिकांनी काम पाडले बंद Video

Fake Parcel Scam: फेक पार्सल स्कॅमचा पर्दाफाश! ओडिशातील एकाला अटक; संशयिताच्या फोनतपासणीत धक्कादायक बाबी समोर

Goa Accident: 'हा माझ्या मुलाला संपवण्याचा कट'! करमळी आंदोलनातील पंचसदस्याचा भीषण अपघात; कुटुंबीयांचा घातपाताचा आरोप

Pernem: पेडणेतील जमीन रूपांतरणाचा विषय! आमदार जीत-मंत्री राणे आमनेसामने; नगरनियोजन मंत्र्यांनी दावा खोडला

Goa Nightclub Fire: दुःख..अश्रू आणि लढा! हडफडेप्रकरणी लुथरा बंधूंच्‍या अर्जावर सुनावणी; मृतांच्या तसबिरी घेऊन जोशी कुटुंब न्यायालयात

SCROLL FOR NEXT