Cases piled up in the Panchayat Directorate Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat: पंचायत संचालनालयात खटले तुंबले

Goa Panchayat: लोकांना मन:स्‍ताप : संचालक हळर्णकर यांच्याकडे अतिरिक्त ताबा

दैनिक गोमन्तक

Goa Panchayat: पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांच्याकडेच अतिरिक्त संचालकपदाचा ताबा दिल्‍याने पंचायत संचालनालयात तब्‍बल दीड हजार खटले तुंबले आहेत. दररोज 100 खटल्यांच्‍या सुनावणींचे वेळापत्रक तयार केले जाते.

त्यापैकी केवळ 20 खटल्यांवरच सुनावणी घेणे त्यांना शक्य होते. परिणामी लोकांना न्‍यायासाठी पंचायत संचालनालयाच्या पायऱ्या झिजवाव्‍या लागत आहेत. पंचायत संचालनालयात अतिरिक्त संचालकांमार्फत विविध खटल्यांची सुनावणी घेतली जाते. त्यासाठी वेगळा कक्षही तयार करण्यात आलाय. स्नेहल गोलतेकर यांना वैयक्तिक कारणास्तव अतिरिक्त संचालकपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आल्यानंतर गेले सात-आठ महिने हा ताबा संचालक हळर्णकर यांच्याकडेच आहे.

पंचायत संचालक हळर्णकर सकाळचा तासभर आणि सायंकाळाचा तासभर सुनावणीसाठी देतात. पंचायत खाते इतर अनेक खात्यांशी थेट जोडलेले असल्याने त्यांना अनेक बैठकांना तसेच मंत्रालयातील कार्यक्रमांनाही जावे लागते. त्यावेळी सुनावणीसाठी मुक्रर केलेले खटले पुढे ढकलण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय राहत नाही. मत्स्योद्योग, कृषी खात्याशी संबंधित बैठकांनाही त्यांना जावे लागते. यामुळेही खटल्यांची सुनावणी लांबणीवर पडते व दूरवरून सुनावणीसाठी आलेल्यांच्‍या हाती केवळ पुढील तारीख पडते.

पंचायतींच्‍या कारभाराविरोधात अर्ज

पंचायत संचालकांसमोर होणाऱ्या सुनावणीसाठी पंचायतीने अन्याय केला असे वाटणाऱ्यांचे अर्ज असतात. पंचायतीने चुकीचा निर्णय घेतला असे वाटून आक्षेप घेतलेल्यांचे अर्ज असतात. पंचायतीने ना हरकत दाखला देण्यास नकार दिलेल्यांचे अपील असते. बांधकाम परवाना देण्यास विलंब केल्याची दाद मागितलेली असते. बेकायदा बांधकामांवर पंचायतीने कारवाई न केल्यास त्याविषयी दाद तसेच व्यापार परवाना नाकारल्यास किंवा देण्यास विलंब केल्यासही दाद मागितलेली असते.

अर्जदाराने आपल्या अर्जावर लवकर निर्णय घ्यावा असा अर्ज केल्यास किंवा उभयपक्षी तडजोडीची शक्यता असल्यास अशा खटल्यांवर लवकर सुनावणी घेण्यात येते. इतर प्रशासकीय कामे सांभाळून सुनावणीसाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न असतो. शेवटी कुठे तरी प्राधान्यक्रम ठरवावा लागतो.
- सिद्धी हळर्णकर, पंचायत संचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa tourism: कझाकस्तानमधून पहिलं चार्टर विमान गोव्यात दाखल, दाबोळी विमानतळावर विदेशी पर्यटकांचं केक कापून स्वागत

Goa Tiger Reserve Controversy: 'काही वाघ फिरतायेत म्हणून व्याघ्र प्रकल्प घोषित करता येत नाही', गोवा सरकारचे सर्वोच्च न्यायालयाच्या समितीला उत्तर

Election Commission: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील 12 राज्यांमध्ये होणार 'एसआयआर'

Goa Politics: "एकटा लढेन, मागे फिरणार नाही",पक्ष तिकीट न मिळाल्यास 'स्वतंत्र' लढणार; डॉ. केतन भाटीकर यांची मोठी घोषणा

Shreyas Iyer: दुखापतीमुळे चिंता वाढली: श्रेयस अय्यरला ICU मध्ये हलवलं; कुटुंबाला सिडनीला नेण्याची तयारी सुरू

SCROLL FOR NEXT