Goa Carnival 2023 | Margao  Dainik Gomantak
गोवा

Goa Carnival 2023: मडगावात उद्या कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक पारंपरिक मार्गावरूनच...

नगरपालिका आयोजन समितीतर्फे तयारी पूर्ण

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Carnival 2023: गोव्यात कार्निव्हल उत्सवास सुरवात झाली असून रविवारी 19 फेब्रुवारी रोजी मडगावात कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. या मिरवणुकीसाठी मठग्राममध्ये मडगाव नगरपालिका आयोजन समितीतर्फे सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

एरव्ही मडगावात कार्निव्हल चित्ररथ मिरवणूक होली स्पिरिट चर्च ते नगरपालिका चौकपर्यंत आयोजित व्हायची. गेली चार वर्षे ही मिरवणूक ओल्ड मार्केटमधील एसजीपीडीए मैदान ते रवीन्द्र भवन मार्गे फातोर्डा येथील बोरकर सुपर स्टोअर्सपर्यंत आयोजित करण्यात येते.

मडगावातील राजकारण बदलले व सध्या सत्तेवर असलेल्या नगरपालिका कौन्सिलने ही मिरवणूक पारंपरिक मार्गानेच आयोजित करण्याचा निर्णय घेतला. रविवारी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत चित्ररथ मिरवणुकीला सुरवात होणार आहे.

होली स्पिरीट चर्च चौकांत तसेच संपूर्ण रस्त्यावर दोन्ही बाजूंनी पताका लावलेल्या आहेत. पोस्ट ऑफिसच्या दोन्ही बाजूला जी वाहतूक बेटे आहेत, ती सुद्धा पताका व रंगीबेरंगी कपडे वापरून सुशोभित केली आहेत.

चित्ररथांना मार्ग मोकळा ठेवण्यासाठी रस्त्यावरील दुभाजक काढण्यात आले असून नगरपालिकेच्या बागेतील ग्रेस चर्च बाजूच्या पथपदावर तात्पुरत्या लोखंडी ग्रील्स बसवून नागरिक रस्त्यावर येणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे.

वाहतूक मार्गांत बदल

नगरपालिका इमारतीखाली दोन मंडप घालण्यात आले असून त्यात बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे तसेच भव्य असा मंचही उभा करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांनी रविवारी (ता. 19) दुपारी 1 वाजल्यानंतर वाहनांसाठी वाहतूक मार्गांत बदल केले आहेत. होली स्पिरीट चर्च चौकातून सुरू झालेले चित्ररथ स्टेट बॅंक ऑफ इंडिया इमारतीसमोर थांबतील.

पंचवीसही प्रभागांत खेळतियात्र

यंदाचा कार्निव्हल उत्सव यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष नगरसेवक कामिल बार्रेटो तसेच नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर व सत्ताधारी पक्षातील इतर नगरसेवक कार्यरत आहेत.

उद्या चित्ररथ मिरवणुकीपूर्वी नगरपालिका चौकातील मंचावर मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा होणार असून सोमवार व मंगळवारी खेळतियात्र, कोकणी संगीत कार्यक्रम आयोजित केले आहेत. मडगावमधील पंचवीसही प्रभागांत खेळतियात्रांचे आयोजन केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: रोहित, विराट, गावस्कर सोडा...'या' खेळाडूकडून मिळते वैभव सूर्यवंशीला जिद्द, चिकाटी आणि प्रेरणा; स्वतःच केला खुलासा

Ashadhi Ekadashi 2025: टाळ-मृदुंगाचा निनाद आणि विठ्ठलनामाचा गजर...आषाढी एकादशीला पंढरपुरात काय-काय करतात?

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

SCROLL FOR NEXT