MLA Carlos Ferreira Dainik Gomantak
गोवा

खंडणी विषय बंद करणाऱ्यांना काहीतरी लपवायचे आहे : फेरेरा

भाजपचे मौन हे गौडबंगाल

दैनिक गोमन्तक डिजिटल

खंडणी ही एक गंभीर बाब आहे आणि खंडणीखोर कोण आहेत, हे सरकारला माहीत असल्याशिवाय कथित रॅकेटचा मुद्दा नगण्य समजू नये. त्याचबरोबर हा विषय बंद झाल्याचा दावा करणाऱ्यांना काहीतरी लपवायचे आहे, असा आरोप आमदार कार्लुस फेरेरा यांनी केला आहे.

राहुल गांधी यांनी, काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये ‘महिलांवर अजूनही लैंगिक अत्याचार केले जात आहेत’, या विधानावर कोणत्याही पीडितेची तक्रार नसताना दिल्ली पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले.

गोव्यात तेजपालच्या प्रकरणात पीडितेची तक्रार न घेताही एफआयआर नोंदविला आणि गोवा पोलिस त्याला अटक करण्यासाठी सरसावले. गोवा पोलिस खंडणी प्रकरणात म्हणूनच कोणतीही तक्रार आलेली नाही!

मायकल लोबो यांनी स्वत:च खंडणी सुरू असल्याचे स्पष्टपणे सांगून हा मुद्दा उपस्थित केला असताना हे प्रकरण बंद झाल्याचा दावा ते कसा करू शकतात? ‘बनावट पत्र’ प्रकरण बंद करण्याचा प्रयत्न करणे, ही एक गोष्ट आहे.

परंतु लोबोंच्या आरोपांचे निराकरण कसे होईल? त्यांचे विधान खोटे होते का? असा सवालही फेरेरा यांनी केला आहे. पोलिसांना गुन्ह्याचा तपास करण्यात किंवा गुन्ह्याची नोंद झाल्यावर ‘सेटिंग'' करण्यात खरोखरच रस आहे काय? अशी शंकाही फेरेरा यांनी उपस्थित केली.

भाजपचे मौन हे गौडबंगाल

सरकारने हे प्रकरण बंद करण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा हे रॅकेट अत्यंत उच्च स्तरावर आणि सरकारमधील लोकांच्या संगनमताने कार्यरत आहे, असा निष्कर्ष जनता काढेल. कायदा व सुव्यवस्थेवरही बोट ठेवले जाईल.

हे जर भाजपेतर सरकारच्या बाबतीत घडले असते, तर भाजपने रस्त्यावर उतरून मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असती, राज्यभर मोर्चे काढून गदारोळ केला असता. परंतु त्यांचे हे मौन गौडबंगाल वाटते, असेही फेरेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Amistad: व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी भारताचं 'ऑपरेशन अमिस्ताद' सुरु! हवाई दलाची विमानं 35 टनांपेक्षा जास्त मदतीसह रवाना

Venezuela Earthquake: भूकंपाने क्षणार्धात होत्याचे नव्हते...डोळ्यांसमोर कोसळली घरं; रात्रभर नागरिक रस्त्यांवर VIDEO

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगापूर्वी मोठी गूड न्यूज! जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार? खिशात येणार बक्कळ पैसा

Goa Traffic Jam: मेरशी चौकात 'एआय'चा झाला पोपट! हायटेक सिग्नल यंत्रणेनं गोमंतकीयांचा केला खोळंबा; वाहनांच्या रांगाच रांगा

Goa Lake Protection: "तलाव बुजवला तर अख्खा परिसर पाण्यात बुडणार!", सॅटेलाईट फोटोंनी उघड केलं दवर्लीतील 'ते' गुपित

SCROLL FOR NEXT