Illegal Construction Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction: "श्रीमंत लोकांसाठी सरकार कायदा बदलते, परंतु गरीब शेतकऱ्यांना मदत करत नाही", आमदार फेरेरांची सरकारवर सडकून टीका

Carlos Ferreira: श्रीमंत लोकांसाठी सरकार कायदा बदलते आणि त्यांना शेती-भाडेपट्ट्याच्या जमिनीवरही बांधकामांसाठी परवानगी देते, असं आमदार फेरेरा म्हणालेत.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: उच्च न्यायालयाने प्रत्येक श्रेणीतील बांधकाम पाडण्याबाबत विशेष उल्लेख केला आहे. मुळात सरकारमधील मंत्र्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती नाही. बेकायदेशीर बांधकाम पाडण्याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नाहीत असे सांगून ते लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप हळदोण्‍याचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी केला.

उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, स्वतःच्या जमिनीवर, शेतजमिनीवर, भाडेतत्त्वावर घेतलेल्या शेतजमिनीवर, रस्त्याच्या कडेला किंवा इतर कोणत्याही ठिकाणच्या बेकायदेशीर व्यावसायिक बांधकामांचे सर्वेक्षण करून कारवाई करण्यासाठी एक कालमर्यादा निश्‍चित केली आहे.

हळदोणा पंचायतीच्या ग्रामसभेत वेगवेगळ्या श्रेणीतील बेकायदेशीर बांधकामांबाबत उच्च न्यायालयाच्या अलीकडच्या आदेशाची फेरेरा यांनी माहिती दिली.

सरकारवर टीका करताना आमदार फेरेरा म्हणाले की, श्रीमंत लोकांसाठी सरकार कायदा बदलते आणि त्यांना शेती-भाडेपट्ट्याच्या जमिनीवरही बांधकामांसाठी परवानगी देते. परंतु गरीब शेतकरी आणि इतरांना मदत करत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT