डिचोली: धावस्करवाडा-कारापूर येथील हाणामारी प्रकरणात गौरीश घाडी याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी सर्वेश धावस्कर (वय ३९ वर्षे) या युवकाला पोलिसांनी अटक केली.
याप्रकरणी धावस्करवाडा आणि कारापूर येथील दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारींची दखल घेत डिचोली पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहेत. तसेच हाणामारीवेळी वापरलेल्या नऊ दुचाकी तसेच लोखंडी रॉड आदी वस्तू पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
महिलांची पोलिस ठाण्यावर धडक
हा राडा पूर्वनियोजित होता, असा दावा धावस्करवाडा येथील महिलांसह ग्रामस्थांनी करीत आज दुपारी डिचोली पोलिस ठाण्यावर धडक दिली. हल्ला करण्याच्या हेतूने आलेल्या कारापूरमधील जमावाने आमच्या घरात घुसून महिलांना शिवीगाळ केली, असे शुभांगी धावस्कर यांनी सांगितले. आमच्या सुरक्षेसाठीच वाड्यावरील काही युवकांनी धाव घेतली, असे त्यांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.