Wildlife  Dainik Gomantak
गोवा

करंझोळ ग्रामस्‍थ: अगोदर जमिनी नावावर करा,नंतर वन्यप्राणी सर्वेक्षण करा

करंझोळ ग्रामस्‍थ आक्रमक: वनाधिकाऱ्यांसमवेत बैठक

दैनिक गोमन्तक

वाळपई: सत्तरी तालुक्यातील करंझोळ व परिसरातील लोकांच्या जमिनी आजही नावावर झालेल्या नाहीत. हे लोक शेकडो वर्षांपासून वास्तव्य करून असून जमीन कसतात. परंतु गोवा मुक्तिनंतर सुरूवातीला वन खाते व नंतर म्हादई अभयारण्य क्षेत्र केल्याने करंझोळ गावावर संक्रात आली. जमीन मालकी मिळावी म्हणून गेल्या काही वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. म्हणूनच आधी सरकारने लोकांच्या जमिनी नावावर कराव्यात व नंतरच म्हादई वन विभागाने वन्यप्राणी सर्वेक्षण काम करावे अशी जोरदार मागणी करंझोळवासीयांनी आज केली. माळोली येथील म्हादई वन विभागाच्या कार्यालयात वनाधिकारी दीपक तांडेल यांच्यासोबत करंझोळ लोकांची आज बैठक झाली.

यावेळी नागरिक हरिश्चंद्र गावस म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी करंझोळ गावात म्हादई वनविभागातर्फे वन्यप्राणी सर्वेक्षणाचे काम करण्यासाठी कर्मचारी आले होते. पण आम्ही त्यांना सर्वेक्षणाचे काम करण्यास विरोध दर्शविला. आधी जमीन मालकी विषय सोडवा व नंतरच तुम्ही तुमचे काम करा, अशी भूमिका घेतली. त्यावरुन आज अधिकारी दीपक तांडेल यांच्यासोबत चर्चा केली व त्यांना आमची भूमिका समजावून सांगितली.

मध्यंतरीच्‍या काळात म्हादई अभयारण्य जाहीर करून लोकांना संकटात टाकले व आता म्हादई विभागाने लोकांनाच अतिक्रमित केले आहे. हिंमत असेल तर आमच्यावर जमिनींवर अतिक्रमण करतो अशी प्रकरणे घालावीत असे आव्हान हरिश्चंद्र गावस यांनी म्हादई वनविभागाला दिले. यावेळी बातू गावडे, बाळा नाईक, काशिनाथ गावडे, अर्जुन गावडे आदींची उपस्थिती होती.

अखिल भारतीय व्‍याघ्र सर्वेक्षणानुसार सत्तरीत कोदाळ, चरावणे, करंझोळ या ठिकाणी काम हाती घेतले आहे. करंझोळ येथे काम करण्यासाठी आमचे कर्मचारी गेले होते. त्यावेळी लोकांनी सर्वेक्षणाचे काम करण्यास विरोध केला. त्यानुसार आज करंझोळवासीयांशी चर्चा करून हा विषय वरिष्ठ पातळीवर कळविला जाईल.

- दीपक तांडेल, म्हादईचे वनअधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT