Zuari Car Accident  Dainik Gomantak
गोवा

झुआरी पुलावरुन कोसळलेल्या कारचा शोध लावण्यात यश

पाण्यात कॅमेराच्या साहाय्याने वाहनाचा शोध घेण्यात येत आहे.

विलास महाडिक

पणजी : अपघातग्रस्त झुआरी नदीत प्रवाशांसह बुडालेल्या वाहनाचा शोध लावण्यात नौदलाच्या डायव्हर्सना 24 तासांच्या आत यश आले आहे. पाण्यात कॅमेराच्या साहाय्याने वाहनाचा शोध घेण्यात येत आहे. वाहनात असलेले मृतदेह अगोदर काढण्यात येणार असून त्यानंतर ही गाडी क्रेनच्या सहाय्याने काढण्यात येणार असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस व नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

झुआरी पुलावरुन काल बुधवारी रात्री बाजूची रेलिंग तुटल्याने एक कार प्रवाशांसह नदीत कोसळून अपघात झाला आहे. अपघातानंतर झुआरी पुलावर शोधकार्य सुरु असून यासाठी नौदलाची मदतही घेतली जात आहे. मात्र मोठी दुर्घटना घडली आहे. अग्निशमन आणि आपत्कालीन कर्मचार्‍यांसह वेर्णा आणि आगशी पोलिसांकडून शोधकार्य सुरु होतं. नौदलाकडूनही आता बचावकार्यासाठी मदत घेतली जात आहे.

झुआरी पुलावरून नदीत पडलेली एसयूव्ही बनावटीची गाडी ही लोटली येथील डीक्रूझ कुटुंबातील असल्याचे दिसते, अशी माहिती नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली असता पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. हे वाहन लोटली येथील प्रेसिल्ला डिक्रूझचे असल्याचा दाट संशय आहे, जी काल रात्री आपल्या पतीसोबत बर्थडे पार्टीसाठी जात होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT