Tillari Car Accident Dainik Gomantak
गोवा

Tillari Car Accident: आजारी वडिलांची विचारपूस करून परताना अपघात, गोव्यातील महिलेचा दुर्दैवी अंत

Women Died In Car Accident At Tillari Canal: रात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातावेळी कारमध्ये किती प्रवासी होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Pramod Yadav

Women Died In Car Accident At Tillari Canal

सिंधुदुर्ग: पुलाला धडकून तिलारीच्या कालव्यात कार कोसळून अपघात झाल्याची घटना मध्य रात्रीच्या सुमारास घडली. यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  कुडासे भोमवाडी येथे रात्री 1 च्या सुमारास हा अपघात झाला.

शुभांगी परब (रा. ओझरी-पेडणे) असे या अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात झाला त्यावेळी सचिन परब कार चालवत होते. सचिन अग्निशमन दलात कार्यरत आहेत. त्यांचे वडील शिवा परब यांची प्रकृती खालावल्याने त्यांना कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आजारी वडिलांची भेट घेऊन परब लहान भाऊ आणि आईला घेऊन कोल्हापुरातून गावाकडे येत होता. यावेळी साटेली - भेडशी येथे त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला.

अपघातानंतर गाडी थेट तिलारीच्या कालव्यात कोसळली, यावेळी कारमधील शुभांगी परब जखमी झाल्या होत्या. त्यांना तात्काळ साटेली - भेडशी येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्यांना मृत घोषित करण्यात आले. यावेळी कारमध्ये सचिन यांचा भाऊ देखील होता. दरम्यान, सचिन आणि त्यांचा भाऊ अपघातातून सुखरुप वाचले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Points Table: भारताच्या 'क्लिन स्वीप'चा पाकिस्तानला फायदा, WTC पॉइंट टेबलमध्ये उलटफेर; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

रस्ते खोदाल तर याद राखा!! PM मोदींच्या दौऱ्यासाठी दक्षिण गोव्यात रस्ते खोदकामावर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

SCROLL FOR NEXT