Kulem Accident News Dainik Gomantak
गोवा

Kulem Accident: 'देव तारी त्याला कोण मारी'; कुत्रे आडवे आल्याने झाला विचित्र अपघात; दोघे आश्‍चर्यकारकरित्या बचावले

गोमन्तक डिजिटल टीम

Kulem Car Plunges Accident News

फोंडा: जीवाचा गोवा करण्यासाठी आलेल्या पश्‍चिम बंगालमधील दाम्पत्यावर काळाचा फेरा आला खरा; पण दैवाची साथ मिळाल्याने ‘देव तारी त्याला कोण मारी’, असा प्रत्यय या दाम्पत्याला आला.

कुळेतील मुख्य रस्त्याच्या शेजारी असलेल्या सात मीटर खोल ओहोळात हे दाम्पत्य असलेली कार कोसळली; पण दैव बलवत्तर म्हणूनच हे दाम्पत्य बचावले. या अपघातात दोघांनाही किरकोळ दुखापत झाली. मात्र, कारची पूर्णत: मोडतोड झाली. अपघाताची स्थिती आणि कारची दशा पाहिल्यावर अनेकांच्या तोंडी ‘द ग्रेट इस्केप’ असेच शब्द निघाले.

पश्‍चिम बंगालमधील मेदिनीपूर येथील अभिषेक घोराय आणि पत्नी शायनी हे दाम्पत्य पर्यटनासाठी गोव्यात आले होते. दूधसागर धबधब्यावर जाण्याची त्यांनी आधीच तयारी केली होती. त्यासाठी घोराय दाम्पत्याने ताळगाव येथील ओळखीच्या साहील फ्रान्सिस्को व्हिएगस यांची कार (क्र. जीए-०७-एन-५७०२) घेतली आणि शनिवारी सकाळी कुळेच्या दिशेने कूच केली होती.

अचानक कुत्रे आले आडवे

अभिषेक कार चालवत होता, तर शायनी त्याच्या बाजूला बसली होती. मात्र, पिकळेवाडी-कुळे येथे पोचल्यावर अचानक त्यांच्या गाडीसमोर कुत्रे आडवे आले. त्यावेळी नियंत्रणासाठी अचानक ब्रेकवर पाय ठेवल्यावर गाडी फिरली आणि रस्त्याच्या बाजूला गेली. रस्त्याच्या बाजूलाच ओहोळ असल्याने कार सुमारे सात मीटर खोल ओहोळात कोसळली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: सुवर्णसंधी! तरुणांनो लागा तयारीला, 'या' सरकारी विभागात होणार मेगा भरती

Mandrem Panchayat: मांद्रेत डोंगरकापणी रोखणार! नवनिर्वाचित सरपंचांचा विश्वास

Margao News: पावसामुळे कोकण रेल्वे उड्डाणपुलावरील रस्ता परत खराब! नव्याने हॉटमिक्सिंग करण्याची लोकांची मागणी

मुख्यमंत्र्यांचा निर्णय 'योग्य'! अभियंत्यांवरच्या कारवाई निर्णयावरून नागरिक समाधानी; पंप ऑपरेटर्सवरही लक्ष देण्याची मागणी

Social Media: ‘या’ 10 देशांतील लोक सोशल मीडियावर घालवतात सर्वाधिक वेळ; जाणून घ्या भारताचं स्टेटस

SCROLL FOR NEXT