Accident At Santa Cruz Church  Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: सांताक्रुझ चर्चजवळ पलटली कार, पानटपरीचेही नुकसान; पण घटनास्थळी रंगली वेगळीच चर्चा...

कित्येक तास कार तशीच पडून

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Santa Cruz Car Accident: गोव्यात पणजीजवळील सांताक्रुझ गावात आज, शुक्रवारी सकाळी एक अजब दृश्य येथे सर्वांना पाहायला मिळाले. येथील चर्चजवळ एक कार रस्त्याकडेला पलटी झालेली दिसत होती. तर तिथेच रस्त्याकडेला असलेली एक पानटपरी देखील पलटी झाली होती आणि अस्ताव्यस्त पडली होती. यात पान टपरीचे नुकसान झाले आहे.

सकाळी येथून ये-जा करणारे पादचारी, वाहनधारक हे सर्वचजण या प्रकाराबाबत उत्सुक दिसत होते, पण नेमके काय घडेल आहे, याची कुणालाही कल्पना नव्हती.

Accident At Santa Cruz Church

वेगवान कारवरील नियंत्रण सुटल्याने ती कार पानटपरीवर जाऊन आदळली आणि नंतर पटली झाली, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तथापि, पलटी कारमध्ये कुणीही नव्हते, किंवा कार कुणाची आहे, याचीही कुणालाही कल्पना नव्हती.

कारचा मालकही सकाळी घटनास्थळी नव्हती. किंवा पोलिसांनीही सकाळी याबाबत काहीही कार्यवाही केलेली नव्हती.

पलटी झालेली कार रस्त्यात नसल्याने वाहतुकीला अडथळा होत नव्हता. त्यामुळे ही कार काही तास येथेच पडून होती. दुपारी पोलिसांनी क्रेन आणून ही कार येथून हटवली. या कारचा अपघात रात्री झाला असावा, अशी घटनास्थळी चर्चा होती. अद्याप या प्रकाराबाबत इतर माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: 'सूर्या' दादाला मिळालं वाढदिवसाचं गिफ्ट, हाय होल्टेज सामन्यात 'Sky'नं षटकार ठोकत पाकड्यांची जिरवली! 7 विकेट्सने चारली पराभवाची धूळ VIDEO

IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT