Car Accident  Dainik Gomantak
गोवा

थिवी येथे अपघातात दोन गाड्यांचे नुकसान

माडेल-थिवी येथील मुख्य रस्त्यावर अपघात झाला.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: थिवी येथे ‘आम्यानी’ परिसरात बुधवारी दुपारी झालेल्या अपघातात दोन कारगाड्यांची समोरासमोर टक्कर होऊन दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, स्विफ्ट कार (जीए 04 ई 3290) व स्कॉर्पिओ (जीजे 03 बीए 2924) या दोन्ही वाहनांतील कुणालाही दुखापत झालेली नाही.

दोन्ही गाड्यांमध्ये एकेकटाच वाहनचालक होता. माडेल-थिवी येथील मुख्य रस्त्यावर हा अपघात (Accident) झाला. धावत्‍या स्विफ्ट कारचे स्टेअरिंग लॉक झाल्याने हा अपघात घडला. त्‍यात स्विफ्ट कारच्‍या दर्शनी भागाचे तर स्कॉर्पिओच्या दरवाजाच्या बाजूने नुकसान झाले. स्विफ्ट कार घेऊन चालक जवाहर देसाई हे म्हापशाहून साखळीच्या दिशेने जात होते, तर स्कॉर्पिओचा चालक थिवीहून पणजीच्या दिशेने येत होता. माडेल येथे रस्त्यावरील दुभाजक संपताच स्विफ्ट कार निसटून चालकाचा (Driver) गाडीवरील ताबा सुटला व समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओवर जाऊन जोरदार धडकली. या अपघाताची माहिती मिळतात कोलवाळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. कॉन्‍स्‍टेबल रूपेश कोरगावकर यांनी पंचनामा केला व दोन्ही वाहने रस्त्याच्या (Road) बाजूला काढली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मला जो गोवा आवडतो, तसा तो राहिला नाही"! सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत; स्थानिक म्हणाला, 'आम्ही रोज या परिस्थितीला तोंड देतोय'

Minor girl Assault: नराधम बस चालकाचे घृणास्पद कृत्य! 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपी बक्षीला 4 दिवसांची पोलीस कोठडी

गोमंतकीय मातीतलं 'ख्रिस्तपुराण'! जेव्हा येशूची जन्मकथा ओवीबद्ध मराठीत अवतरली...

Goa Fraud Case: फ्लॅट विक्रीच्या नावाखाली 25 लाखांचा गंडा; दाबोळीतील दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

राहुल द्रविडचा मोठा विक्रम उध्दवस्त; स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास! केली 'ही' मोठी कामगिरी

SCROLL FOR NEXT