St. Xavier's Exposition RW
गोवा

St. Xavier's Exposition: 'या' सरकारकडे इच्छाशक्तीच नाही! 'पोप फ्रान्सिस' मुद्द्यावरून विरियातोंनी सुनावले खडे बोल

Viriato Fernandese: पोप फ्रान्सिस यांना आमंत्रित करण्यात आले नसल्याचे दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी मडगावात सांगितले

गोमन्तक डिजिटल टीम

St. Xavier's Exposition in Old Goa

सासष्टी: जुने गोवे येथील गोंयच्या सायबाचे पार्थिव दर्शन २१ नोव्हेंबर २०२४ ते ५ जानेवारी २०२५ या कालावधीत होणार आहे. या पार्थिव दर्शनाला पोप फ्रान्सिस यांना पंतप्रधानांमार्फत आमंत्रित करण्यात येणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले होते. मात्र, अजून पोप फ्रान्सिस यांना आमंत्रित करण्यात आले नसल्याचे दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी आज मडगावात सांगितले.

या संदर्भात विचारलेल्या प्रश्र्नाला उत्तर देताना फर्नांडिस यांनी सांगितले की, आपण आपल्या दिल्लीतील सूत्रांकडून घेतलेल्या माहितीप्रमाणे अजून पोप फ्रान्सिस यांना आमंत्रण पाठविण्यात आलेले नाही, अशी माहिती मिळाली आहे. पोप फ्रान्सिस यांना आमंत्रित करताना काही शिष्टाचार पाळायचे असतात. काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस पूर्व आशियाई देशांमध्ये येऊन गेले. हे देश भारताच्या अगदी जवळ असल्याने त्यांना आमंत्रित करणे सोपे झाले असते, असेही खासदार फर्नांडिस यांनी सांगितले.

पोपना आमंत्रित करण्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे, जी या सरकारपाशी नसल्याचेही कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी सांगितले. अजूनही वेळ टळलेली नाही. सरकारला खरोखरच पोपना आमंत्रित करायचे असेल ते त्यांना आतासुद्धा करता येते. मात्र, खोटारडेपणा करू नका, सत्य काय ते लवकरच कळेल, असेही खासदार फर्नांडिस म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT